कोणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही असं म्हटलं जातं, सध्या अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रात्रीत करोडपती बनला आहे. शिवाय हा व्यक्ती करोडपती बनायला त्याच्या बोयकोची आणि मुलाची आठवण कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती कामानिमित्त पत्नी आणि मुलांपासून दूर राहत होता. यावेळी त्याने आपल्या कुटुंबीयांच्या आठवणीत असे काही काम केले की तो रोतोरात ९० कोटींचा मालक बनला. ही गोष्ट त्याच्या घरच्यांना समजताच त्यांनादेखील सुखद धक्का बसला.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हे प्रकरण चीनमधील हांगझोउ शहरातील आहे. येथील ३० वर्षीय व्यक्ती कामाच्या निमित्ताने शहरातून बाहेर राहत होता. त्यामुळे त्याला शहरात आपल्या घरी सतत येणं-जाणं जमत नव्हतं. त्यामुळे तो अनेकदा बायको आणि मुलांच्या आठवणीत काही लॉटरीची तिकिट तिकिटे खरेदी करत होता. पण आता त्याचे नशीब बदलले आहे, कारण त्याने विकत घेतलेल्या लॉटरीचा नंबर लागला आहे. लॉटरी लागलेल्या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. परंतु पूर्व चीनच्या झेजियांग प्रांताची राजधानी हांगझोउ येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि ३ मुलांच्या जन्मतारखांशी संबंधित लॉटरीचे तिकिट घेऊन ७७ दशलक्ष युआन म्हणजेच ९० कोटीहून अधिकची लॉटरी जिंकल्यांचं सांगण्यात आलं आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Sachet and Parampara blessed with baby boy
लग्नानंतर ४ वर्षांनी सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी मुलाचा जन्म, व्हिडीओ शेअर करून दिली Good News
Tanvi Mundle
“तो असता तर आयुष्य…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री वडिलांबद्दल झाली व्यक्त, म्हणाली…

बायको आणि मुलांच्या आठवणीत बनला करोडपती –

घटनेतील व्यक्तीने महिन्याच्या सुरुवातीला ३०० रुपयांची १५ लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. त्याने पत्नी आणि तीन मुलांच्या जन्मतारीखांमधून काळजीपूर्वक निवडलेल्या क्रमांकाची तिकिट विकत घेतली होती. लॉटरी प्राधिकरणाने ११ जुलै रोजी निकाल जाहीर केला तेव्हा ‘वू’ आडनाव असलेल्या व्यक्तीने लॉटरी जिंकली होती. तो म्हणाला की माझ्या प्रत्येक लॉटरीच्या तिकिटाला ५.२४ दशलक्ष युआनचे बक्षीस मिळाले आहे. जे झेजियांगमधील या वर्षीचे हे सर्वात मोठे लॉटरीचे बक्षीस आहे.

‘वू’ म्हणाला, लॉटरीच्या क्रमांकांमध्ये माझी पत्नी आणि माझ्या मुलांच्या जन्मतारखांचा क्रमांक समाविष्ट आहे. मी या वर्षाच्या सुरुवातीपासून हे नंबर वापरत होतो. वूच्या घटनेवर एका चिनी सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटलं आहे की, जो व्यक्ती आपल्या कुटुंबावर प्रेम करतो तो त्याचे नशीब चांगले असते. तर दुसऱ्याने लिहिलं आहे, “ही देवाने दिलेली भेट आहे.”

Story img Loader