Viral Video : सोशल मीडियावर सार्वजानिक ठिकाणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मेट्रोमधील व्हिडीओ चर्चेत येतात तर कधी लोकलमधील गर्दीचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणत्या सार्वजानिक कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी बसमधील विचित्र घटनांचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीच्या डिटीसी बसमध्ये एका तरुणाचा मोबाईल चोरतानाची घटना कैद झाली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a man has stolen phone from back pocket of pant delhi dtc bus video goes viral)
व्हायरल व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडीओ दिल्लीच्या डिटीसी बसमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण बसमध्ये उभ्याने प्रवास करताना दिसत असेल. त्याच्या शेजारी एक व्यक्ती सुद्धा उभ्याने प्रवास करताना दिसतेय. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही व्यक्ती हळूच या तरुणाच्या पॅन्टच्या मागच्या खिशातून मोबाईल काढते पण तरुणाला याविषयी थोडी सुद्धा जाणीव होत नाही. मोबाईल चोरतानाचा हा व्हिडीओ पाहून कोणालाही चांगलाच धक्का बसेल. व्हिडीओ पाहून काही लोकांच्या अंगावर काटा येऊ शकतो पण टेन्शन घेऊ नका कारण हा व्हिडीओ खरा नाही. एका तरुणाने दिल्ली डिटीसी बसमध्ये मोबाईल कसे चोरतात, याचे चित्रिकरण करत या व्हिडीओद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : ‘तिला’ भेटायला आला अन् गेम झाला; समोर गर्लफ्रेंड अन् मागे बाबा, नेमकं काय घडलं? बघा VIDEO
official_rajthakur__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिल्लीच्या डिटीसी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “माझा नवीन फोन असाच चोरीला गेला होता. ज्या दिवशी विकत घेतला त्याच दिवशी चोरीला गेला” तर एका युजरने लिहिलेय, “पॅन्टच्या मागच्या खिशात कोण फोन ठेवतो?” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी दररोज असे दोन तीन पाकीट मारताना बघतो” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून त्यांचा अनुभव सांगितला आहे तर काही लोकांनी स्क्रिप्टवर प्रतिक्रिया देत टिका केल्या आहेत.