Viral video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी भयानक स्टंट करताना दिसतो तर कधी कोणी अजब जुगाड सांगताना दिसतो.
काही लोक भन्नाट संदेश पाटीवर लिहून, ती पाटी हातात घेऊन रस्त्यावर उभे राहतात व लोकांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करतात. तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभा आहे आणि येणारे जाणारे लोक त्याच्या पाटीवरील संदेश वाचून थक्क होत आहे. या तरुणाने या पाटीवर नेमके काय लिहिलेय, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण हातत पाटी घेऊन उभा आहे आणि येणारे जाणारे लोक त्याच्या पाटीवरील संदेश वाचताना दिसत आहे. काही लोक फोटो तर काही लोक व्हिडीओ काढताना दिसत आहे. या पाटीवर लिहिलेय, ” भावांनो उत्सव देवीचा आहे. सगळ्या महिलांमध्ये देवीच बघा.”
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या तरुणाने हा संदेश लिहिला आहे. सध्या देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. त्यामुळे महिलांचा आदर करा, या उद्देशाने हा संदेश लिहिला आहे.
हेही वाचा : “प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात…”, दुकान वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड; VIDEO पाहून युजर्सही झाले भावूक
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral video)
shiva__aarya__.007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” भावांनो उत्सव देवीचा आहे.
सगळ्या महिलांमध्ये देवीच बघा” हा व्हिडीओ पुण्याचा आहे.
हेही वाचा : पिसाळलेल्या हत्तीसमोर अचानक रिक्षा झाली उलटी, पाहा चालकासह प्रवाशांनी कसा वाचवला जीव; थरारक Video Viral
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या वर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लालबागमध्ये तरुणाची पाटी व्हायरल चर्चेचा विषय ठरली होती. गणेशोत्सवादरम्यान य तरुणाने पाटीवर असे काही लिहिले होते की पाहून सगळ्याच मुली लाजताना दिसल्या. या तरुणाने पाटीवर लिहिले होते, “फक्त गर्दीत हात धरणारी नको सोबत हरतालिकेचा उपवास धरणारी हवी” या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.