देशभरात ईद अल अधा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त देशभरात विविध ठिकाणी बकऱ्यांचे बाजार भरतात, कुर्बानीसाठी बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे या काळात बकऱ्यांना खूप भावदेखील मिळतो. काही बकऱ्यांची तर लाखो रुपयांमध्ये विक्री होते. त्यामुळे अनेक मेंढपाळ, व्यापारी या दिवसात त्यांच्याकडील बकरे विकण्यसाठी बाजारात नेतात. पण सध्या एका मेंढपाळाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे ईदच्या पार्श्वभूमीवर या मेंढपाळाच्या बकऱ्यावर तब्बल एक कोटी रुपयांची बोली लागली होती, तरीही त्याने तो विकण्यास नकार दिला आहे. या मेंढपाळाने असं का केलं हे वाचल्यानंतर तुम्हीदेखील आश्चर्यचकीत व्हाल यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे प्रकरण राजस्थानातील चुरूमधील आहे. येथील तारानगरमधील राजू सिंह नावाच्या मेंढपाळाच्या अनोख्या बकऱ्यावर अनेकांनी बोली लावली होती. बोलीची सुरुवातच ७० लाखांपासून झाली होती आणि ती एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. एवढी मोठी रक्कम मिळल्यामुळे राजूचे नशीब पालटून गेले असते असते. इतकेच काय त्याच्या पुढील आयुष्यासाठीही या पैशांचा उपयोग झाला असता. पण मेंढपाळाने बकऱ्यावरील प्रेमापोटी ही कोट्यवधीची ऑफर नाकारली आहे. राजूने ही ऑफर नाकारल्याचं समजताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बकऱ्याच्या पोटावर ७८६ लिहिलं आहे –

मिळालेल्या माहितीनुसार, हा बकरा १ वर्षाची असून त्याच्या पोटावर ७८६ लिहिलं आहे. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. मुस्लीम धर्मात ७८६ हा आकडा अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे ईदसाठी हा बकरा काही लोकांना विकत घ्यायचा होता. शिवाय यासाठी ते राजूला मागेल ती किंमत द्यायला तयार होते, मात्र राजूने बकऱ्यावर खूप प्रेम असल्यामुळे त्याला विकणार नसल्याचं सांगितलं.

प्रेमापोटी डावलले १ कोटी –

महत्वाची बाब म्हणजे राजू या बकऱ्याची खूप काळजी घेतो, त्याला अननस, पपई, बाजरी आणि हिरव्या भाज्याही खायला देतो. राजू म्हणाला, “७८६ चा अर्थ काय आहे आणि त्याला एवढं महत्व का आहे मला माहिती नाही, मात्र मला हा बकरा खूप आवडतो, त्यामुळे मी त्याला विकू शकत नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man in rajasthan refused to sell goats despite being offered rs 1 crore bakri eid 2023 news viral jap
Show comments