सोशल मीडियावर माकडांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मानवी वस्तीत शिरून माकडे धुमाकूळ घालतात, तर कधी त्यांचा खोडकरपणा कॅमेरात कैद होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओत तीन माकडांना एक व्यक्ती दारू पाजताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, तीन माकडे बसलेली आहेत आणि एका व्यक्तीच्या हातात दारूची बाटली आहे. व्हिडीओत पुढे दिसेल, हा व्यक्ती तिन्ही माकडांना एकाच दारूच्या बाटलीतून दारू पाजत आहे. ही तिन्ही माकडे दारू पिण्यासाठी एकमेकांच्या तोंडातून बाटली हिसकावून घेत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.

हेही वाचा : VIDEO : धक्कादायक ! नसते धाडस बेतले जिवावर, पूराच्या पाण्यात कारसह २०-२५ लोक गेले वाहून

यापूर्वीही अनेकदा माकड दारू पितानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्यसनी माकडांविषयी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, पण असे माकडांना किंवा कोणत्याही प्राण्यांना दारू पाजणे खूप चुकीचे आहे.

april__07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले, “हे खूप वाईट आहे, असे कधीही करू नये.” तर एका युजरने लिहिले, “मुक्या प्राण्यांबरोबर असा व्यव्हार करू नये”