Viral Video : आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही. सोशल मीडियावर दर दिवशी हजारो लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर करत टॅलेंट दाखवत असतात. कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो तर कधी कोणी डान्स करताना दिसतो. टिव्हीवर डान्स रिअॅलिटी शोमध्ये असे अनेक उत्तम डान्सर येतात ज्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस खूप सुंदर बेली डान्स करत आहे. त्याचा डान्स पाहून कोणीही अवाक् होईल. एका रिअॅलिटी शोमधील हा व्हिडीओ आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओत तुम्हाला दिसेल स्टेजवर कार्यक्रम होस्ट करणारा मनिष पॉल उभा आहे. स्टेजवर त्याच्या शेजारी अनेक माणसं उभे आहेत. त्यातील एक जण समोर येतो आणि डान्स करायला सुरूवात करतो. तो त्याच्या कंबरवर झालट लटकवतो आणि बेली डान्स करताना दिसतो. त्याच्या डान्स स्टेप्स पाहून कोणीही थक्क होईल. हा माणूस इतका सुंदर डान्स करतो की शेवटी कार्यक्रमाचे परिक्षक सुद्धा त्यांच्या जागेवरून उठतात आणि त्याचे कौतुक करताना दिसतात. हा माणूस माइया माइया गाण्यावर अप्रतिम डान्स करतो. व्हिडीओ पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. तो बेली डान्सची प्रत्येक स्टेप खूप सुंदररित्या करताना दिसतो. त्याच्या प्रत्येक स्टेपवर लोक टाळ्या वाजवताना दिसतात. पॅन्ट शर्टमध्ये बेली डान्स करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : प्रत्येक घरासमोर उभ्या आहेत आलिशान ‘Supar Cars’; विदेशातला नव्हे भारतातील ‘या’ शहरातला आहे VIDEO
danceplus003_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अप्रतिम”. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “मलायकापेक्षा पण सुंदर नाचतो” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी कमेंट्समध्ये त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.