पुण्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही. “जो चुकतो तो माणूस, जो चुका सुधारतो देव माणूस आणि चुकतचं नाही तो पुणेकर” असे वर्णन पुणेकरांच्या स्वभावाचे केले जाते. पुणेकर काहीही झालं तरी स्वत:च मत खरे करतात मग विषय काहीही असो. पुण्यात हेल्मेट सक्ती असूनही रस्त्यावर दुचाकी चालवताना पुणेकर कधीच हेल्मेट घालत नाही पण हेच पुणेकर मेट्रोमध्ये चक्क हेल्मेट घालून प्रवास करत आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल पण असा प्रकार खरंच पुण्यात घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेल्मेट आणि पुणेकरांचा तसा छत्तीसचा आकडा आहे. पुण्यात हेल्मेट सक्ती असून अनेकदा हेल्मेट वापरण्यासाठी चालकांना जागरुक करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. तरीही रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणारे अनेक लोक दिसतात. पोलि‍सांनी पकडल्यास हेल्मेट न वापरण्याचे सतराशे पन्नास कारणे सांगतील. पोलिसांच्या भितीने अनेकदा हे काही लोक हेल्मेट परिधान करतात आणि नियमांचे पालन करतात पण काही लोकांवर हेल्मेट सक्तीचा जास्तच प्रभाव झालेला दिसत आहे कारण पुण्यात एक व्यक्ती चक्क पुणे मेट्रोमध्ये हेल्मेट परिधान करून प्रवास करत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून पुणेकरीही चक्रावले आहेत.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर beingpunekarofficial नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ पुणे मेट्रोतील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”Just Pune things.” मेट्रो रुळावरून सुटत आहे दरम्यान मेट्रोच्या एका कोचमध्ये बसलेल्या प्रवाशाने हेल्मेट परिधान केल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरले नाही. अनेकांनी पुणेकरांची खिल्ली उडवली तर अनेकांनी ती व्यक्ती पुणेकर नाही असा दावाही केला.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडीओवर कमेट करताना एकाने लिहिले की, “वाहतूक कोंडीने वैतागलेला दुचाकी चालक!”

दुसऱ्याने लिहिले की, आपल्या सर्वांनाच माहित आहे की, “हेल्मेट हे अजिबात पुणेरी नाही.”

तिसऱ्याने कमेंट केली की, “हटके…दुचाकीवर नाही पण फक्त मेट्रोत हेल्मेट वापरत आहे, याला म्हणतात चौकटी बाहेर जाऊन विचार करणे.”

चौथ्याने लिहिले की,”मेट्रोमध्ये हेल्मेट घातले का नाही हे तपासतात का?

पाचव्याने लिहिले, ‘हे पुणे आहे, इथे बाईक चालवताना नाही पण मेट्रोमध्ये हेल्मेट घालून जाणार.”

एकाने मजेत म्हटले, मेट्रोमध्ये थंडी वाजत असेल तक दुसरा म्हणाला, “कोणी ओळखायला नको म्हणून घातले असेल”

एकाने दावा केला की.”व्हिडीओतील व्यक्ती पुणेकर नसणार. पुणेकर रस्त्यावर हेल्मेट घालत नाही ते मेट्रोत हेल्मेट घालणे तर शक्यच नाही”

आणखी एक जण मेट्रोची खिल्ली उडवत म्हणाला की, “मेट्रो चालकवर विश्वास नसेल त्याचा…”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man seen wearing a helmet and travelling in the pune metro video goes viral netizens funny reaction snk