A man sitting on a road was hit by a truck : व्यसन करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यात मद्याच्या आहारी गेलेले लोक व्यसन केल्यानंतर स्वत:ला जरा जास्तच शहाणे समजू लागतात. नशेच्या भरात आपण काय करतोय याचं त्यांना भानदेखील नसतं. स्वत: नको ते उपद्याप करून दुसऱ्यांना त्रास देतात, परंतु अशा वेळेस त्यांना याचा धडा शिकवणंही तितकच गरजेचं असतं.

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे, ज्यात एक माणूस पोलिस चौकीसमोर अगदी रस्त्याच्या मधोमध बसला आहे आणि काहीच वेळात या गाड्यांच्या गर्दीत एका ट्रकची त्याला धडक लागते.

Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
Shocking video Boy sitting at a bus stop was hit by a bus video goes viral
बस स्टॉपवर बसलेल्या तरुणावर ड्रायव्हारने घातली बस; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप; VIDEO पाहताना सावधान

व्हायरल व्हिडीओ (Viral Video of a man hit by a truck)

उत्तर प्रदेशच्या प्रतापगड येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक माणूस तिथल्या पोलिस चौकीसमोरच्या रस्त्यावर बसला आहे. भररस्त्यात, गाड्यांच्या गर्दीत अगदी रस्त्याच्या मधोमध खुर्चीवर ठाण मांडून बसलेल्या या व्यक्तीचा अपघात होता होता वाचला आहे. रस्त्याच्या मधोमध बसला असताना मागून एक ट्रक येतो आणि त्याच्या खुर्चीला धडक देऊन जातो (man hit by a truck). धडक देताच खुर्चीसकट तो माणूस खाली कोसळतो.

या व्हायरल व्हिडीओचा पहिला भाग पत्रकार ‘Ranvijay Singh’ यांनी शेअर करत “पोलिस चौकीसमोर रस्त्याच्या मधोमध बसलेला बढाईबहाद्दर”, असं कॅप्शन व्हिडीओला दिलं होतं. त्यानंतर काही वेळाने @sauravyadav1133 या एक्स अकाउंटवरून याच माणसाचा एक दुसरा व्हिडीओ समोर आला, ज्याला “त्याच्या पुढील व्हिडीओ हा आहे- ट्रकने धडक दिली (man hit by a truck) आणि त्याची सगळी नशा पळवून लावली” असं कॅप्शन दिलं होतं. या व्हिडीओत ट्रकची धडक लागताच तिथे जमलेला काही जमाव “बढिया हुआ” असंदेखील म्हणताना दिसतायत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

स्टंटबाजी करण्याच्या माणसाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं, “हे खूपच धोकादायक होतं… क्षणार्धात काहीही घडू शकलं असतं.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे बरोबर केलं, मद्याचं व्यसन केल्यानंतर लोक स्वत:ला शक्तिशाली समजू लागतात.” तर एकाने “त्याने योग्य गोष्ट केली” अशी कमेंट केली.

दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या या माणसाने असे का केले हे अजूनही अस्पष्ट आहे. तो माणूस तिथे बसून पोलिस अधिकाऱ्यांचा निषेध करत होता की त्याचं कारण काही वेगळं होतं, हे अद्याप ठाऊक नाही.

Story img Loader