Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अस्वल चक्क हार्मोनिका वाजवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
तु्म्ही आजवर कुत्रा, मांजर, गाय, बकरी इत्यादी प्राण्यांचे व्हिडीओ पाहिले असेल. कुत्र्याची माणसाबरोबरची मैत्री आणि त्यांच्या नात्यातील जिव्हाळा आपण अनेकदा व्हायरल व्हिडीओमध्ये बघत असतो पण तुम्ही माणसाची अस्वलाबरोबरची खास मैत्री पाहिली आहे का? या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अस्वलाला चक्क हार्मोनिका वाजवायला शिकवत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसेल जी हार्मोनिका वाजवताना दिसत आहे. त्यानंतर ही व्यक्ती समोर बसलेल्या अस्वलाच्या हातात हार्मोनिका देते आणि त्याला वाजवायला सांगते. अस्वल हार्मोनिका हातात पकडतो आणि वाजवण्याचा प्रयत्न करतो. व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे को हार्मोनियम वाजवताना दिसतो. सध्या या अस्वल आणि माणसाची मैत्री चर्चेचा विषय ठरली आहे. अस्वलाला संगीत शिकवताना पाहून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अस्वलाची या व्यक्तीबरोबर असलेली ही अनोखी मैत्री थक्क करणारी आहे, हा व्हिडीओ भारतातील नाही तर रशियातील आहे.

हेही वाचा : अशीही बनवाबनवी! सायकलपासून बनवली रस्त्यावर धावणारी रेल्वेगाडी, कामगारांचा अनोखा जुगाड पाहिला का?

panteleenko_svetlana या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून ही एक रशियन व्यक्ती आहे जी अस्वलाला हार्मोनिका शिकवत आहे. अस्वलाने ज्या प्रकारे हार्मोनिका वाजवले, ते पाहून कोणीही अवाक् होईल. हा व्हिडीओ पाच लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “रशियन लोकं अस्वल सुद्धा पाळतात?” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम, खूप सुंदर” आणखी एका युजरने लिहिलेय, “अस्वलाबरोबर बसणे खूप धोकादायक आहे” अनेक युजर्सना हे अस्वल नाही तर कुत्रा वाटत आहे.