कर्नाटकातील बंगळुरू येथील एका विचित्र घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओतील व्यक्ती एका उड्डाणपुलावरुन विनाकारण पैसे उधळताना दिसत आहे. ही घटना बंगळुरू येथील के.आर मार्केटजवळील आहे.
व्हिडीओतील व्यक्तीजवळ एक पैशाने भरलेली पिशवी असून तो या पिशवीतून १० रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल बाहेर काढताना दिसत आहे. शिवाय या व्यक्तीने पुलावरुन खाली पैसे फेकताच ते गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर पश्चिम विभागाचे डीसीपी लक्ष्मण बी निंबर्गी यांनी सांगितले की, हवेत १० रुपयांच्या नोटा उधळणारी ती व्यक्ती कोण आहे ? आणि तो पैसे का उधळत होता ? याबाबची काही माहिती उपलब्ध झालेली नाही. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पैसे उधळणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.
हेही पाहा- ‘या’ रीलमुळे पोलिसांनी तरुणीला ठोठावला १७ हजारांचा दंड; पोलीस म्हणाले, “Viral Video पाहून…”
हेही पाहा- शाळेत घेऊन जाणाऱ्या आईवर रुसला आणि चक्क स्कुटीवर मांडी घालून बसला, Video पाहून पोट धरून हसाल
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती उड्डाणपुलावरुन खाली नोटा उधळताना दिसत आहे. शिवाय पुलावरुन नोटा खाली पडल्याचं दिसताच त्या उचलण्यासाठी अनेक लोकांनी पैसे उचलण्यासाठी गर्दी केल्याचंही दिसत आहे. दरम्यान, मागील वर्षी हैदराबादमधूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. येथे एका व्यक्तीने ५०० रुपयांच्या अनेक नोटा हेवत उधळल्या होत्या केला. त्या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.