Viral Video : शल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावर कार जाताना दिसत आहे. पिवळ्या रंगाची ही कार अत्यंत आकर्षक दिसत आहे. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की ती कार नव्हे तर माणूस आहे, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल की, एखादी कार माणूस कशी असू शकते, ही कल्पनाही केली जाऊ शकत नाही पण हे खरंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्यावर छोटी कार जाताना दिसत आहे पण अचानक ही कार थांबते. त्याचं चाक, दार, छत सर्व काही एकमेकांपासून वेगळे होते आणि एक माणूस उभा असल्याचा दिसतो. तेव्हा कुठे समजते की ही कार नसून माणूस आहे. या माणसाने आपल्या शरीराभोवती कारचे काही पार्ट्स लावले आहेत जेव्हा तो उभा राहतो तेव्हा हे पार्ट्स एकमेकांपासून वेगळे होतात आणि जेव्हा तो दोन्ही हात व पाय जमिनीवर ठेवतो तेव्हा ते पुन्हा एकमेकांना जोडले जातात आणि एक कार तयार होते. तुम्हाला हे दृश्य पाहून ट्रान्सफॉर्मर चित्रपटाची आठवण येऊ शकते तिथे अशाच प्रकारे कारपासून तयार रोबोट होताना तुम्ही पाहिले असतील, सध्या या व्हिडीओची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : “…मी त्याची मस्तानी मीच त्याची काशी….” बायकोने उखाण्यातून थेट सांगितले, VIDEO होतोय व्हायरल
The Best या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “खूप छान. या कारला पेट्रोल डिझेलची काहीही आवश्यकता नाही” काही युजर्सना हा व्हिडीओ पाहून ट्रान्सफॉर्मर चित्रपटाची आठवण आली आहे. आणखी एका युजरने लिहिलेय, “आतापर्यंतचा सर्वात चांगला ट्रान्सफॉर्मर”