Viral Video : इतरांना सहकार्य करणे किंवा मदत करणे, हे एक खूप चांगले कार्य आहे. गरजूंच्या मदतीला धावा, असे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रसंगी इतरांना मदत करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला तरुणींची मदत करणे चांगलेच महागात पडले. नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Man Tries to Help Girls Who Fell Off Scooty, But What Happens Next is Shocking)
पापाच्या परींची मदत करायला गेला तरुण अन् होत्याचं नव्हतं झालं
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुणी स्कुटीवरून येताना दिसेल. अचानक त्यांचा तोल जातो आणि त्या स्कुटी घेऊन खाली पडतात. त्यानंतर त्या जागेवरून उठतात. तितक्यात एक तरुण धावत येतो आणि त्यांची स्कुटी उचलण्याचा प्रयत्न करतो. तरुण स्कुटी उचलतो पण चुकून एक्सीलेटरवर हात ठेवतो आणि स्कुटी नदीच्या दिशेने पुढे जाते. स्कुटीसह तो सुद्धा नदीच्या दिशेने जातो. स्कुटी घेऊन हा तरुण नदीत पडतो. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “भाऊला परत कुणाची मदत करायची इच्छाच होणार नाही. भाऊ मदत करायला गेला होता”
हेही वाचा : VIDEO: दहावीनंतर शाळा सोडली आणि चहाची टपरी सुरू केली, ते आज थेट दुबईत इंट्री; ऑफिस पाहून थक्क व्हाल
पाहा व्हायरल व्हिडीओ
yogeshkamble27 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “स्कुटी वरून जर कोणी पडलं असेल तर पहिल्यांदा स्कुटी बंद करावी अन्यथा अशा गोष्टी होतात हे माझ्याकडून पण एकदा झालं होतं पण मी गाडी सोडून दिली होती ती पुढे जाऊन पडली.” तर एका युजरने लिहिलेय, “असेच एकदा माझ्या मित्राबरोबर झाले” आणखी एका युजरने लिहिलेय, “पापा का परा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.