Viral Video: स्वतःसह इतरांचाही प्रवास सोईस्कर व्हावा म्हणून अनेक चालक गाडीमध्ये अनोख्या गोष्टी बसवून घेतात. गाडीच्या मागे कुटुंबातील सदस्यांची नावं, प्रसिद्ध व्यक्तींची पोस्टर्स, तर काही जण बाहुलं, उशी ठेवूनसुद्धा गाड्या सजवताना दिसतात. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये अनेक वाहनचालकांनी स्वतःची गाडी सजवल्याचं पाहिलं असेल. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण- एका वाहनचालकानं त्याच्या गाडीत चक्क सिलिंग फॅन बसवून घेतला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ परदेशातील आहे. आजकाल बहुतांश वाहनांमध्ये ‘एसी’ हा असतोच. पण, ज्यांच्याकडे एसी नसलेल्या जुन्या गाड्या आहेत; त्यांनी काय करावे? यावर उपाय म्हणून एक व्यक्ती भन्नाट जुगाड घेऊन आली आहे. एका व्यक्तीकडे अशीच एक जुनी कार होती; पण त्या गाडीत एसी नव्हता. यावर उपाय म्हणून काय करावे, असा प्रश्न त्या चालकाला पडला आणि मग त्याने घरात असणारा सिलिंग फॅन गाडीत बसवून घेतला. व्यक्तीनं केलेला हा जुगाड व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

हेही वाचा…VIDEO: ‘पास होण्याची इच्छा…’ गणिताचा पेपर गेला अवघड; मुलाने लिहिली अशी कविता की… शिक्षकाने दाखवला विद्यार्थ्याचा ‘तो’ पेपर

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, व्यक्ती तिच्या कारमध्ये पुढच्या सीटवर बसली आहे. तसेच या कारमध्ये एसी नव्हे, तर मागच्या सीटच्या अगदीवर सिलिंग फॅन बसविण्यात आला आहे; जेणेकरून प्रवाशांना प्रवासादरम्यान हवेशीर प्रवासाचा अनुभव घेता येईल. व्यक्तीच्या डोक्यापासून थोड्याच अंतरावर पंखा लावण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही बाब हास्यास्पद असण्याबरोबरच धोकादायकसुद्धा आहे. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या या अनोख्या गाडीने एका अनोळखी व्यक्तीचे लक्ष वेधून घेतले आणि या गाडीचा व्हिडीओ त्याने शूट करून घेतला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून कमेंट्समध्ये मजेशीर प्रतिक्रिया व काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “कारमध्ये हेल्मेट घालणे आवश्यक आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “चालक खतरों का खिलाडी’ आहे.” तिसरा युजर म्हणाला, ‘गाडी चालविताना अचानक ब्रेक लावला, तर त्या व्यक्तीच्या डोक्याला पंख्याचा धक्का लागू शकतो.” आदी अनेक कमेंट्स व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.

Story img Loader