Viral Video : लोकप्रिय आणि महागडी लँबॉर्गिनीची सगळीकडे चर्चा सुरू असते. प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याने आयुष्यात एकदा तरी लँबॉर्गिनी कार घ्यावी. या कारला हायस्पीड कार सुद्धा म्हणतात. सध्या अशाच एका मराठी तरुणाने लँबॉर्गिनी कार खरेदी केली आहे. पण ही कार इतर लँबॉर्गिनी कारपेक्षा हटके आणि वेगळी आहे. तुम्हाला अशी लँबॉर्गिनी कार कुठेही सापडणार नाही. तुम्हाला वाटेल या लँबॉर्गिनी कारमध्ये काय खास आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल आणि हा तरुण लँबॉर्गिनी कारवर झाकलेला भगव्या रंगाचा कापड उचलताना दिसतो. जसा तो भगव्या रंगाचा कापड उचलतो तेव्हा आपल्याला सुंदर लँबॉर्गिनी कार दिसते. ही कार सुद्धा भगव्या रंगाची दिसतेय. या लँबॉर्गिनी कारवर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा साकारली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली ‘जाणता राजा’ असे लिहिलेय. ही लँबॉर्गिनी कार पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पु्न्हा पुन्हा लँबॉर्गिनी कार तुम्हाला पाहावी असे वाटेल. त्यानंतर हा तरुण महाराजांच्या प्रतिमेवरून हात फिरवतो.शेवटी व्हिडीओत दिसते की महाराजांची प्रतिमा साकारलेला भगवा झेंडा घेऊन हा तरुण कार चालवताना दिसतो.
officialbeniwa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये इंग्रजीत लिहिलेय, “Worlds first Lamborghini with Chhatrapati Shivaji Maharaj” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “मराठी माणसाने एकत्र या. आपल्या माणसाला मोठा करा पैशांनी म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या घरासमोर ही गाडी पाहिजे आणि त्यावर आपले महाराज.” तर एका युजरने लिहिलेय, “या गाडीची किंमत आज १०० पटीने वाढली. माझ्या राजाच्या चित्राने… जय शिवराय जय श्रीराम” आणखी एका युजरने लिहिलेय, “आता रोज गाडी स्वच्छ ठेवायची माऊली”