हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अनेक भागात पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पाणी तुंबल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पूरासोबतच वीज पडण्याचाही सर्वात मोठा धोका असतो. दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात, याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विजेचा भयानक प्रकार पाहायला मिळत आहे. यावेळी एक तरुण थोडक्यात बचावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, अचानक आकाशात वीज चमकली आणि थेट जमिनीवर पडली. वीज पडतानाची दृश्यं पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एक तरुण या रस्त्यावरुन जात आहे, यावेळी तो रस्ता ओलांडतो आणि वीज कोसळते, त्यामुळे हा तरुण थोडक्यात वाचतो. यावेळी वीज पडली तेव्हा त्या मुलाशिवाय कोणीही तिथे उपस्थित नव्हते. आधी विजेचा प्रकाश पडला, जोराने मेघगर्जना झाली आणि वीज जमिनीवर पडली. ज्या ठिकाणी वीज पडली, त्या ठिकाणी आग लागली. विजेचे हे भीषण दृश्य जवळच बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळले झुरळ; फोटो व्हायरल होताच कडक कारवाई

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हैदराबादमध्ये पाऊस या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे मुसळधार पावसात घराबाहेर पडण्याची चूक करू नका. घरी रहा आणि सुरक्षित रहा.