Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते; तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकड चक्क पाणीपुरी खाताना दिसतेय.
पाणीपुरी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडते; पण माकडालाही पाणीपुरी तितकीच आवडते हे बघून तुम्ही थक्क व्हाल. पाणीपुरी खातानाचा आनंद घेणाऱ्या माकडाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
माकडाला आतापर्यंत आपण फळे आणि बिस्किटे खाताना पाहिले असेल; पण पाणीपुरी खातानाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
हेही वाचा : रोमँटिक डान्स करून जोडप्याने समुद्रकिनारी लावली आग, व्हायरल व्हिडीओ पाहिला का?
या व्हायरल व्हिडीओमध्ये माकड पाणीपुरीच्या गाडीवर बसून पाणीपुरी खाताना दिसतेय. विशेष म्हणजे पाणीपुरीच्या गाडीवरील मालकही माकडाला पाणीपुरी खाऊ देतोय. या व्हिडीओमध्ये तुम्हाला इतर लोकही दिसतील; जे माकडाला पाणीपुरी खाताना आश्चर्याने बघत आहेत.
हेही वाचा : हृदयस्पर्शी! बेघर मुलीची पाळीव कुत्र्याबरोबर खास मैत्री, चेंडू खेळतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
@GawaiGajanan या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘गुजरातच्या टंकारा येथील दयानंद चौकातला माकडाचा पाणीपुरी खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.’ सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. युजर्स या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.