Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कदायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या एका प्राणी संग्रहालयातील असाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये चक्क माकड महिलेच्या अंगावर धावून आलेले दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी कुणाच्याही अंगावर शहारा येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्राणी संग्रहालयात प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवले जाते. या व्हायरल व्हिडीओमध्ये माकडाला एक महिला पिंजऱ्याच्या बाहेरुन बघत होती. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अचानक माकड पिंजऱ्याची कडी काढतो आणि महिलेच्या अंगावर धावून येतो.
माकड इतक्या वेगाने महिलेच्या अंगावर धावून येते की ही महिला खाली पडते. माकडाला दोरीने बांधलेले असते. दोरीमुळे त्याला अधिक हालचाल करता येत नाही तरीसुद्धा माकड महिलेचे कपडे फाडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पुढे व्हिडीओत दिसेल की प्राणीसंग्रहालयातील एक कर्मचारी धावून येतो आणि माकडाच्या तावडीतून महिलेची सुटका करतो. विशेष म्हणजे ही महिला या घटनेदरम्यान हसताना दिसत आहे.

हेही वाचा : तरुणाईमध्ये काकांची हवा! भन्नाट डान्स पाहून तुम्हीही चाहते व्हाल , VIDEO एकदा पाहाच

_.instaclub या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजरने हसण्याचे इमोजी सुद्धा शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “पिंजऱ्यातील प्राणी बघताना काळजी घ्यावी” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मला खूप हसायला आले”