सध्या सोशल मीडिया हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये प्राण्यांशी आणि जंगलाशी संबंधित अनेक व्हिडीओ असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला थक्क करणारे असतात, तर काही पोट धरुन हसवणारे असतात. सध्या एका माकडाचा असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एका माकडाने चक्क एका महिलेचा मोबाईल घेतला असून तो मोबाईल माकड देत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे महिलेला तिचा मोबाईल परत मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओमध्ये, एक माकड उंच सुरक्षा भिंतीवर बसल्याचं दिसत आहे. यावेळी त्याच्या हातामध्ये एक मोबाईल दिसत आहे. हा मोबाईल घेण्यासाठी एक महिला एकामागून एक खाद्यपदार्थ माकडाला देण्याचा प्रयत्न करते पण ते माकड ते पदार्थ घेत नाही आणि मोबाईलदेखील परत देत नाही.
दरम्यान, व्हिडीओत पुढे दिसत आहे की, काही वेळाने महिला तिच्या पर्समधून सफरचंद काढते आणि माकडाला देते यावेळी माकड लगेच ते सफरचंद घेतं. यानंतर महिला माकजाला आणखी एक सफरचंद देताच माकड लगेच महिलेला मोबाईल देतो. त्यामुळे या माकडाने सफरचंदच्या बदल्यात मोबाईल परत केल्याची डिल चांगली असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. हा व्हिडीओ खूप मजेशीर असून तो पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. माकडाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे आजकाल माकडदेखील योग्य डिल करत असल्याचं काही नेटकरी म्हणत आहेत.