Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी त्यांची कला दाखवताना दिसतो तर कधी कोणी त्यांचे चांगले वाईट अनुभव शेअर करताना दिसतो. काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होतो तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला प्रेरणा मिळते. कधी मैत्रीच्या नात्याविषयी तर कधी आईवडिल आणि मुलांच्या नात्याविषयी, कधी बहिण भावाच्या नात्याविषयी तर कधी पती पत्नीच्या नात्याविषयी भावुक करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सहसा सासू सुनेच्या नात्यातील गोडवा खूप क्वचितच दिसून येतो.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सासूने सुनेला खूप भावनिक पत्र लिहिले आहे आणि हे पत्र तिच्या वाढदिवशी सासरे वाचून दाखवत आहे. हा भावुक करणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातील अश्रु थांबणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ वाढदिवसाचा आहे. सासू सासरे सुनेचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. तिच्या एका बाजूला सासू तर एका बाजूला सासरे बसलेले आहे. तिच्यासमोर टेबलबर केक ठेवला आहे. सासूबाईने सुनेसाठी लिहिलेले पत्र सासरे वाचून दाखवत आहे. नेमकं काय लिहिलंय पत्रात, जाणून घेऊ या.

“मला माझी मुलगी व माझी सून यात काही उणीव जाणवली नाही. तुझ्याकडून मिळणाऱ्या प्रेमानं सुनेची तू कन्या कधी झालीस, हे कळलंच नाही मला. बरं झालीस तू माझी मुलगी म्हणून माझ्या वाटेला आली नाही, नाहीतर तू ही लग्नानंतर सासरी गेली असतीस. आता तू सून असल्यामुळे मी घरात जितके वर्ष असेल तोपर्यंत मी तुझ्याच मी तुझ्यासोबत आणि तु माझ्यासोबत सैदव राहणार आहेस मायेचं वर्ष घडत अनेक जन्मांतरी पुण्य शिल्लक असल्यामुळं तू मला सून म्हणून लाभली, देवाचे आभार मानते. तुझा स्वभाव शांत आणि समंजस आहे. तणावपूर्वक वातावरणात सुद्धा समंजसपणा आणि प्रेमाने राहते. योगेश बाहेर असतानाही मला मायेने, काळजीने सांभाळते आणि काय हवं मला. तुझ्या हातच्या चवदार रंगामुळे तू नातेवाईकामध्ये आपलंस करून घेतलं. खरंच अन्नापूर्णा राहणे, जीवनामध्ये किती गरजेचं आहे. त्यामुळे सर्व तुझे कौतुक करतात. खरं सांगू का तेव्हा मला माझा अभिमान वाटतो. किती लिहू आणि काय काय लिहू मी धन्य झाले. – अंजू”

हे पत्र वाचत असताना सून आणि सासू दोन्ही भावुक होताना दिसतात. सुनेला अश्रु आवरत नाही. व्हिडीओच्या शेवटी त्या एकमेकींना मिठी मारताना दिसतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ

pimpalkaranand या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सासूने सुनेला लिहिलेलं आणि सासऱ्याने वाचून दाखवलेले हे पत्र जरूर ऐका !
या जगात सासू आणि सून यांचं नातं खरं तर टॉम अँड जेरी सारखं काही ठिकाणी साप आणि मुंगसासारखं…. असं म्हणतात की सून कधी मुलगी होऊ शकत नाही आणि सासू कधी आई…. पण निसर्गाला सुद्धा अपवाद आहेत तसे या नियमाला सुद्धा अपवाद….. एका सासूने आपल्या सुनेला सरप्राईज देऊन साजरा केलेला वाढदिवस आणि तिच्यासाठी लिहिलेलं एक ह्रदयस्पर्शी पत्र….. प्रत्येक मुलीला अशी सासू आणि प्रत्येक सासूला अशी सून मिळाली तर घर नंदनवन होईल…. असंख्य दुःख असंख्य घरफुटी थांबतील आणि केवळ आणि केवळ प्रेमाचाच निज वर्षाव होऊन सासूरुपी आईचा आणि लक्ष्मी रुपी सुनेचा एकतत्वी ईश्वर रूपाचा अंश त्या घराला लाभेल आणि जन्मजन्मांतरी आत्मे कृतकृत्य होतील…..

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सासुबाईंचं विशेष कौतुक आहे कारण ह्या सगळया गोष्टी त्यांनी टिपल्या आणि मान्य केल्या नाहीतर काही सासवा हे तुझ कर्तव्य आहे म्हणून लेबल लावून सोडून देतात आणि स्तुति लांबच पण प्रेमाचे दोन शब्द पण नाही, असो बाकी ह्यांचा आनंद असाच राहो कोणाची नजर लागू नये” तर एका युजरने लिहिलेय, “खरच असे सासू सासरे सगळ्या मुलीना भेटायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाप रे आपसूक डोळ्यातून पाणी आले .” एक युजर लिहितो, “भाग्य लागतं अशी सून मिळालया” तर एक युजर लिहितो, “असे सासर मिळायला नशीब लागतं.” काही युजर्स सुनेचे कौतुक करत आहे तर काही युजर्स सासू सासऱ्यांचे कौतुक करत आहे.