Viral Video : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्या सुद्धा अधिक आहे. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक एमपीएससी विद्यार्थ्याचे स्वप्न असते की एकदिवस एमपीएससीच्या परिक्षेत पास व्हावे. या दरम्यान त्यांना शहरात राहण्यासाठी आणि खाण्यासाठी लागणारा पैसा जुळवून घेणे खूप कठीण जाते. (a mpsc guy started a hotel business in pune while doing study video goes viral on social media)

सध्या अशाच एका एमपीएससी विद्यार्थ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या विद्यार्थ्याला पाहून इतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. कारण या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने पु्ण्यात स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. हा तरुण एमपीएससीचा अभ्यास करत स्वत:चा व्यवसाय चालवतो. त्याने हॉटेल एमपीएससी कट्टा या नावाने एक हॉटेल सुरू केले आहेत. तरुणाच्या या हिंमतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा : ‘नियम म्हणजे नियम…!’ सिग्नल पाहून थांबली ‘गाय’, वाहतूक नियमाचे पालन; VIDEO शेअर करीत पुणे पोलिसांकडून कौतुक

सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये या तरुणाच्या या व्यवसायाविषयी माहिती सांगितली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

एमपीएससी करणाऱ्या तरुणाने पुण्यात व्यवसाय सुरू केला. मराठवाड्याचा झणझणीत पौष्टिक निलंगा पुण्यामध्ये मिळणारे एकमेव ठिकाण आहे. पौष्टिक आणि पित्तविरहित निलंगा इथे फक्त २० रुपयांमध्ये मिळतो. त्याचबरोबर इथे तुम्हाला वडापाव, मिसळ आणि नाश्त्याचे पदार्थ पण मिळतील.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हा तरुण हॉटेलमध्ये स्वयंपाक करताना दिसत असेल. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” एमपीएससीचा अभ्यास करत स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या आपल्या
मराठी भावाला नक्की सहकार्य करा..” याशिवाय या कॅप्शनमध्ये या हॉटेलचा पत्ता आणि वेळ सुद्धा लिहिलीय, “हॉटेल MPSC कट्टा ; वेळ : सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत, ठिकाण- नागनाथ पार चौक जवळ , सदाशिव पेठ पुणे.

हेही वाचा : ‘आमच्याकडे एका फटक्यात दारू सोडवून मिळेल’ व्यसन सोडवायला आलेल्या मद्यपीला खतरनाक ‘प्रसाद’; VIDEO पाहून पोट धरून हसाल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी येथील जेवणाचा आस्वाद घेतला. खूप छान आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान”