Viral Video : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी या बसेसमधील मजेशीर किस्से तर कधी भावनिक क्षण टिपलेले व्हिडीओ समोर येतात. या बसेसला लोक प्रेमाने लालपरी सुद्धा म्हणतात. लालपरीबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे घनिष्ठ नाते आहेत.
लालपरीचे कंडक्टर किंवा चालक सुद्धा सोशल मीडियावर रील किंवा व्हिडीओ बनवून लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लालपरीचे कंडक्टर दादा चक्क डान्स करताना दिसत आहे. कंडक्टरचा हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ते मनमोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक लाल परी बस उभी आहे आणि त्याच्यापुढे कंडक्टर दादा डान्स करत आहे. या दादाने खाकी रंगाचा पोशाख घातला आहे. कंडक्टर “अरे होगा तुमसे प्यारा कौन” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. कंडक्टरच्या अतिशय सुंदर स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
तुम्ही आजवर कंडक्टरला तिकीट काढताना पाहिले असेल पण कंडक्टरचा असा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हल्ली कंडक्टर आणि ड्रायव्हर स्वत:च्या मनोरंजनासाठी व्हिडीओ किंवा रील करताना सोशल मीडियावर दिसतात.

हेही वाचा : VIDEO: “माऊली -माऊली काय सांगू…” पुणेरी पाटीनं वारकऱ्यांचं लक्ष वेधलं; आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

baba_mandhare_32532 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ट्राय केला, कसा जमला ते सांगा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान दादा. एवढ्या सर्व तणावातून स्वतः साठी वेळ काढलाच पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “लालपरीचे सेवक… भारी जमलय हो” आणखी एका युजरने लिहिलेय, “दादा मी बसची वाट बघतोय कधीपासून… घेऊन या लवकर, तुम्ही नाचताय राव” एक युजर लिहितो, “ज्यांनी ज्यांनी कमेंट केली की तरीच लालपरी उशिरा येते, एकच सांगायचं आहे , तुम्ही जस तुमचं आयुष्य जगता तस यांना पण आयुष्य जगायचा हक्क आहे… मजा मस्ती करून जगता आले पाहिजे प्रत्येकाला , राहिला प्रश्न यांच्या सेवेचा तर किती खराब गाड्या असतात तरी व्यवस्थित आपल्याला प्रवास घडवून देतात … सलाम आहे”