माहितीच्या अधिकाराचा लोक कशाप्रकारे ‘वापर’ करतात याबद्दलची एक बातमी सध्या चर्चेत आहे. मुंबईच्या तरूणाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागवली आहे. आता या माणसाला जर भारतात रक्त पिसासून म्हणजे झॉम्बींचा किंवा परग्रहावरील माणसाचा हल्ला झाला तर भारत सरकार काय करणार हे जाणून घ्यायचे आहे.
अजय कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्याने काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला. जर झॉम्बी म्हणजे रक्त पिणारी माणसे किंवा एलिअन्स आले तर भारत सरकार काय करणार असे त्याने विचारले आहे. या दोघांनशी लढण्याकरता आपण काही योजना आखल्या आहेत का त्यांचा  सामना करण्यासाठी भारत सरकार कशा प्रकारे सज्ज आहे अशी विचारणा त्याने केली आहे. पराराष्ट्रमंत्रालयाने ही माहिती आपल्याला द्यावी असेही त्याने म्हटले आहे. कहर म्हणजे रक्त पिसासूंशी लढा देण्याकरता आपण विल स्मिथची मदत घेणार आहोत का असा मुर्खपणाचा प्रश्नही त्याने विचारला आहे.
परदेशातील साय फाय चित्रपटांत झॉम्बीचे हल्ले  आणि अशा काल्पनिक कथा दाखवतात. कदाचित अशाप्रकारचे चित्रपट पाहिल्याचा परिणाम म्हणून की काय त्याने ही माहिती मागवली असेल. पण हे पहिल्यांदा होत नाही. आतापर्यंत अनेक महाभागांनी या कायद्याचा वापर करत अशाप्रकारची माहिती मागवली आहे. एकाने शहरात किती झाडे हिरवीगार आहेत याची माहिती मागवली होती. तर एकिने रक्षाबंधनच्या दिवशी जॉर्ज बुश यांना पाठलेले लाडू कुठपर्यंत पोहचले असे देखील विचारले होते. Yourti.in ने फेसबुकवर ही पोस्ट काही दिवसांपूर्वी टाकली होती त्यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली.

rti-main

 

Story img Loader