Viral Video : अनेक जण पाळीव प्राणी पाळतात आणि त्या पाळीव प्राण्याला घरच्या सदस्यांप्रमाणे प्रेम देतात, त्यांची काळजी घेतात. त्यांचे चांगले जेवण, त्यांची आरोग्य तपासणी आणि एवढंच नाही तर त्यांना खेळणी सुद्धा पुरवतात पण मुंबईची एका महिलेने तिच्या कुत्र्यासाठी असे काही केले की पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. तिने तिच्या कुत्र्यासाठी चक्क अडीच लाखाची सोनसाखळी केली. सध्या या महिलेची जोरदार चर्चा सुरू आहे.

चेंबूर येथील अनिल ज्वेलर्सनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला तिच्या कुत्र्यासाठी सोनसाखळी खरेदी करताना दिसत आहे. या महिलेचे नाव सरिता सलदान्हा असून तिच्या पाळीव कुत्र्याचे नाव टायगर आहे.

कुत्र्यासाठी केली चक्क अडीच लाखाची सोनसाखळी!

सरिता सलदान्हा या मुळच्या मुंबई येथील चेंबूर परिसरात राहतात. मागच्या महिन्यात त्यांनी टायगरचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त सरिता यांनी त्याला सोनसाखळी केली. ही सोनसाखली ३५ ग्रॅमची असून त्याची किंमत अडीच लाखांहून अधिक आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सरिता या सोनसाखळी खरेदी करत आहे तर त्यांचा कुत्रा टायगर हा निवांत बसलेला आहे. जेव्हा सरिता टायगरला सोनसाखळी घालून देतात तेव्हा कुत्र्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. दुकानातील मालक, कर्मचारी आणि ग्राहक कौतुकाने त्याच्या बघत असतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा : VIDEO : ऑनलाइन मुलाखतीत ओठ हलवून बोलण्याचा करत होता दिखावा, दुसरी व्यक्ती देत होती उत्तरे, मुलाखत घेणाऱ्याने नक्कल करताना पकडले

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या महिलेने तिच्या कुत्र्याविषयीचे प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केले आहेत. कुत्रा आणि माणसाचे नाते हे जगावेगळे आहे. अनेकदा त्यांच्यातील प्रेम, काळजी, मैत्री दर्शवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर होत असतात. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. कधी मालक कुत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून आला आहे तर कधी कुत्रा मालकाचा जीव वाचवताना दिसला आहे. कुत्रा आणि माणसाच्या या जगावेगळ्या मैत्रीचे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.