Mumbai Local Train : लोकल म्हणजे मुंबईची लाइफलाइन मानली जाते. दरदिवशी हजारो लोक लोकल ट्रेन प्रवास करतात. एक दिवस जरी लोकल बंद असेल तरी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे कामं थांबवतात. सोशल मीडियावर या लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी लोकल ट्रेनमध्ये गाणी गाताना दिसतो तर कधी कोणी डान्स करताना दिसतो. कधी लोकल ट्रेन मध्ये लोक भांडताना दिसतात तर कधी गुण्यागोविंदाने सण साजरा करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणासह काही प्रवासी लोकलमध्ये भजन गाताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओ एका लोकल ट्रेनमधील आहे. या व्हिडीओत तुम्हाला काही प्रवासी भजन गाताना दिसत असेल. या व्हिडीओतील एका तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण तो सुरुवातीला भजनाच्या ओळी म्हणतो आणि त्यानंतर इतर प्रवासी त्याच्या ओळीला सूर लावतात. भजन गाणाऱ्यांचा हा ग्रुप अप्रतिम भजन गाताना दिसत आहे. सांग ना देवी माझ्या भावाला हे भजन गीत ते गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हेही वाचा : “बायकोचं प्रेम असंच असतं”; भररस्त्यात बायकोने नवऱ्याच्या शर्टावर केलं असं काही की…, VIDEO पाहून व्हाल अवाक
पाहा व्हायरल व्हिडीओ
suhas_bandagale_19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सांग ना देवी माझ्या भावाला, मुंबई लोकल ट्रेनमध्ये भजन”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सुंदर गायला दादा” तर एका युजरने लिहिलेय, “नाद असावा तर असा असावा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “दादा तुमचा आवाज सारखच आहे. सुंदर” एक युजर लिहितो, “अप्रतिम आवाज जय महाराष्ट्र”
अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
हेही वाचा : “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” भर रस्त्यात तरुणांबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं?
हे पहिल्यांदा नाही. यापूर्वी सुद्धा लोकलमध्ये भजन गीत गाणाऱ्यांचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. नेटकरी अशा व्हिडीओंवर कौतुकाचा वर्षाव करतात.
काही दिवसांपूर्वी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दसरा साजरा करतानाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. या हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले होते की हे फक्त मुंबईतच दिसू शकते.