Viral Video : डान्स हा अनेकांचा आवडीचा विषय आहे. लहान मुले, तरुण मंडळी एवढंच काय तर वृद्ध सुद्धा आवडीने डान्स करताना दिसतात. सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की लाखो लोक या व्हिडीओला लाइक करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक नव विवाहित जोडपं डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुमची नजर हटणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला नव विवाहित जोडपं दिसेल आणि त्यांच्या अवतीभोवती नातेवाईक दिसेल. हे जोडपं सर्वांसमोर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स एवढ्या जबरदस्त आहे की तुमची नजर हटणार नाही. त्यांची ऊर्जा पाहून तुम्हालाही क्षणभरासाठी डान्स करावासा वाटेल. त्यांच्या डान्सवर घरचे लोक त्यांना चीअर्स करताना दिसत आहे. हे जोडपं प्रोफेशनल डान्सर वाटत आहे. एकदा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा त्यांचा डान्स बघावासा वाटेल.
या जोडप्याचं काही दिवसांपूर्वी लग्न झालंय. सोशल मीडियावर त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. पण या व्हिडीओने या जोडप्याला अधिक लोकप्रियता मिळवून दिली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

anncelestina या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही कदाचित सर्वोत्तम डान्स केला नसेल पण आम्ही सर्वोत्तम वेळ घालवला.
आज उद्या आणि नेहमी तुझ्याबरोबर डान्स करत राहणार”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही का म्हणताहेत सर्वोत्तम डान्स केला नाही, मी आजवर पाहिलेला सर्वात सुंदर डान्स आहे” तर एका युजरने लिहिलेय, “तुमच्या डान्समधील संवाद, आनंद आणि ऊर्जा तुमच्या आयुष्यात कायम राहो, हीच शुभेच्छा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “वडीलधारी मंडळीही प्रोत्साहन देत आहेत, हे पाहून खूप आनंद झाला.” अनेक युजर्सनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.