Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृती एक भाग आहे. लग्न समारंभ असो किंवा कोणत्या शुभ प्रसंगी लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते, यालाच आपण उखाणा म्हणतो. सोशल मीडियावर अनेक उखाण्याचे व्हिडीओ शेअर केले जातात. सध्या असाच एक उखाणा चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका नववधूने सुंदर उखाणा घेतला आहे. तरुणीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून उखाणा घेतला आहे. अनेक तरुण मंडळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आपला आदर्श मानतात. याच भावनेने या नववधूने सुंदर उखाणा घेतला आहे.

उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल

सध्या लग्नसराईला सुरुवात झाली असून सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच हा एक लग्नातील व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नववधू दिसेल. तिने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. कपाळावर टिकली लावली आहे, हातात हिरवा चुडा घातला आहे, हातावर सुंदर मेहेंदी काढली आहे; या लूकमध्ये ही नववधू खूप सुंदर दिसत आहे.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल, ती उखाणा घेताना म्हणते, “काल १९ फेब्रुवारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या जयंती निमित्त नाव घेते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीने आणि युक्तीने, सागर रावांचं नाव घ्यायला सुरुवात करते आजपासून प्रेमाने आणि भक्तीने…” त्यानंतर तिच्या अवती भोवती उखाणा ऐकत असलेले नातेवाईक एकच जल्लोष करतात. मराठमोळ्या नवरीचा हा उखाणा ऐकून तुम्हीही भारावून जाल. व्हिडीओत नवरीने सांगितल्याप्रमाणे, उखाण्याचा व्हिडीओ २० फेब्रुवारीचा आहे म्हणजेच जुना आहे.

हेही वाचा : जुगाड असावा तर असा! कार पार्किंगसाठी जागा नव्हती म्हणून लढवली शक्कल, व्हिडीओ एकदा पाहाच…

पाहा व्हायरल व्हिडीओ

shrunkhala_naik_vlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवरीने म्हणजेच श्रृंखला नाईकने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लग्नातील उखाणा…” या व्हिडीओवर ३० हजारहून अधिक व्ह्यूज आले असून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हा उखाणा खूप आवडला.

Story img Loader