Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके हृदयस्पर्शी असतात की पाहून कोणीही भावूक होईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी बसमध्ये खाली सांडलेलं धान्य गोळा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अन्नाची किंमत करणाऱ्या शेतकऱ्याची आठवणे येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असं म्हणतात, अन्नाची किंमत फक्त शेतकरीच समजू शकतो. सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजी दिसेल. ही आजी बसमध्ये खाली सांडलेलं धान्य गोळा करताना दिसत आहे. आजी सर्व धान्य पु्न्हा पिशवीत भरताना दिसत आहे.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजीला धान्य भरताना पाहून एक व्यक्ती आजीला मदत करताना दिसतो आणि धान्य गोळा करण्यास मदत करतो. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून शेतकरी अन्नाची किती किंमत करतात, हे दिसून येईल.

हेही वाचा : Optical Illusion : तुम्हाला या फोटोमध्ये श्री स्वामी समर्थ दिसताहेत का? एकदा क्लिक करून नीट पाहा

ganesh_shinde_mh21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “निःशब्द…”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलेय, “अन्नाची ज्याला किंमत तोच असा करू शकतो” तर एका युजरने लिहिलेय, “ज्याला एक एक अन्नाच्या दाण्याची किंमत कळते ना तो खरा शेतकरी” आणखी एका युजरने लिहिलेय, “कष्टाचं आहे शेवटी” काही युजर्सनी व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तिवर टीका केली आहे. व्हिडीओ काढण्यापेक्षा आजीला मदत करायला पाहिजे होती, असे युजर्स म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A old lady collecting grains spilled in the bus the video viral only farmer can know the importance of food ndj
Show comments