Viral Video : सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचे एकापेक्षा एक भारी आणि मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही उखाण्याचे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील; पण सध्या सोशल मीडियावर एका आजीच्या उखाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या आजीने त्यांच्या खानदेशी अंदाजात खूप सुंदर उखाणा घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ तुम्हाला दिसेल की, आजीला गृहप्रवेशाच्या वेळी उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो तेव्हा आजी सुंदर उखाणा घेते. हा उखाणा इतका मोठा असतो की, पारंपरिक उखाणा कसा असतो, हे तुम्हाला या व्हिडीओतून कळेल.
सध्या कोणीही दोन दोन ओळींचे उखाणे घेतात; पण आजीच्या मोठ्या आणि अनोख्या उखाण्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भारावून जाईल. सध्या हा खानदेशी उखाणा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : वर्गात लपून फोनवर बोलत होता विद्यार्थी, शिक्षक गुपचूप शेजारी जाऊन बसले; मजेदार व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

shrutibawaskarwagh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजीने घेतला सुंदर खानदेशी उखाणा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “भाग्यवान आहे.. तुझ्याकडे आजी आहे. काळजी घे आणि तिला जप.” तर एका युजरने लिहिलेय, “आज्जी, तुला या मोठ्या उखाण्यासारखं मोठं आयुष्य लाभो..” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर.. अप्रतिम आजीबाई.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A old lady khandeshi ukhana video goes viral on social media ndj