Viral Video : सोशल मीडियावर समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोणी डान्स करताना किवा गाणी म्हणताना दिसत नाही तर हा व्हिडीओ एका समारंभातील स्वयंपाकघरातला आहे. या व्हिडीओमध्ये एक आज्जी मोठी चपाती कशी बनवायची, सांगताना दिसत आहे.हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रीयन समारंभात मोठी चपाती बनवण्याची पद्धत आहे.सहसा घरी चपाती बनवताना आपण लहान चपाती बनवतो पण समारंभात जास्त लोकांसाठी स्वयंपाक केला जातो तेव्हा मोठी चपाती बनवली जाते. अशाच एका समारंभातील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये आज्जी मोठी चपाती कशी बनवायची, हे सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे आजीने मोठी चपाती करुन दाखवली आहे. सुरुवातीला आजी दोन मोठे कणकीचे गोळे घेते. त्या दोन कणकीच्या गोळ्यामध्ये एक आणखी कणकीचा गोळा ठेवते आणि तिन्ही गोळे एकावर एक ठेवून चपाती कशी पद्धतशीर लाटायची, हे व्हिडीओत आजी सांगताना दिसत आहे. नंतर एवढी मोठी लाटलेली चपाती तव्यावर कशी टाकायची, हे सुद्धा आजीने व्हिडीओत सांगितले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना व्हिडीओ पाहून त्यांच्या आजीची आठवण येऊ शकते.

Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

हेही वाचा : “संस्कृती जपणारी शिवकन्या…” साडी नेसून बस चालवणाऱ्या महिलेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

rajashri_katkar_vlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाराष्ट्रीयन समारंभातील मोठी चपाती”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “अशी पोळी बनवायला कौशल्य पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “माझी आजी सुद्धा अशीच मोठी चपाती बनवायची. व्हिडीओ पाहून आज आठवण आली” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त आज्जी”

Story img Loader