Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता खांद्यावर बसून लग्नाच्या वऱ्हाडात नाचत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसर वऱ्हाडी मंडळींनी भरलेला दिसून येत आहे. काही वेळानंतर संपूर्ण वऱ्हाडी मंडळी डीजेच्या गाण्यावर डान्स करत आहेत. तिथेच काही तरुणही डान्स करत आहेत, मात्र काही वेळातच हे तरुण एका आजोबांना खांद्यावर उचलून घेतात आणि डान्स करण्यास सुरुवात करतात.
डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या आजोबांना जोरदार दाद दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर abhay_kalsule_photography या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की, आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. या वयातदेखील आजोबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर हा डान्स अतिशय छान असल्याचे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाहता येईल.