Viral video: सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता अक्षरश: डीजेच्या बेसवर ऊभं राहून नाचत आहेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसर वऱ्हाडी मंडळींनी भरलेला दिसून येत आहे. काही वेळानंतर संपूर्ण वऱ्हाडी मंडळी डीजेच्या गाण्यावर डान्स करत आहेत. तिथेच काही तरुणही डान्स करत आहेत, मात्र काही वेळातच सर्वांचं लक्ष या आजोबांकडे जातं. ‘तुम्हा बघून तोल माझा गेला’ गाण्यावर आजोबांनी खतरनाक डान्स केला आहे. आजोबांनी डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या आजोबांना जोरदार दाद दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “काकूंना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले” ठाण्यात महिलांनी साडीमध्ये वाजवला रॉक बँड; VIDEO पाहून नेटकरीही थक्क

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर pbutter0902•Original audio या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की, आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. या वयातदेखील आजोबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर हा डान्स अतिशय छान असल्याचे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाहता येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A old man dance in the village on tumha baghun tol maza gela marathi song video goes viral on social media trending srk