Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मजेशीर डान्स करताना दिसून येतात. सध्या असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल धोतर नेसलेले वृद्ध व्यक्ती डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या अतरंगी डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वेगवेगळ्या डान्स स्टेप्स करताना ते व्हिडीओत दिसत आहे. या वृद्ध व्यक्तीचा डान्स पाहायला आजुबाजूला लोकांची खूप गर्दी सुद्धा दिसत आहे. लहान मुलांपासून सर्वजण त्यांचा डान्स आवडीने पाहत आहे.
हेही वाचा : बापलेकीचं नातं जगावेगळं असतं! वडिलांबरोबर चिमुकली करतेय तुफान मस्ती, VIDEO एकदा पाहाच
mr_suryaansh_bhai__06 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वृद्ध व्यक्ती डान्स करताना..”
सोशल मीडियावर असे अनेक डान्स व्हिडीओ चर्चेत येत असतात. अतरंगी डान्स स्टेप्स आणि सुंदर हावभावामुळे युजर्सना असे डान्स व्हिडीओ पाहायला आवडतात.