Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण वेगवेगळ्या गाण्यावर रिल्स बनवताना दिसतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा “नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच” या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हे आजोबा घरीच एका मराठी गाण्यावर डान्स करत आहे. “नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..” या लोकप्रिय गाण्यावर आजोबा तुफान डान्स करताना व्हिडीओत दिसत आहे. त्यांचे हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल की जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना वयाचं बंधन नसते. हे आजोबा सुद्धा डान्सचा भरपूर आनंद घेताना दिसत आहे.
manishshetye786 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “काका एकच मन आहे, किती वेळा जिंकणार..” तर एका युजरने लिहिलेय, “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे”