गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक जण छोट्या छोट्या कार्यात सहभाग घेत असतो. या गणेशोत्सवादरम्यान कला सादर करण्यासाठी ढोल-ताशा पथक आणि लाठी-काठी पथक महिनाभरापासून सराव सुरू करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लाठी-काठीचा जोरदार सराव सुरू आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा होण्यामागे कारण म्हणजे या व्हिडीओत एक वृद्ध आजोबा अतिशय उत्साहाने लाठी-काठीचा सराव करताना दिसत आहेत. बरोबरीने सराव करणाऱ्या मुलांपेक्षा हे आजोबा अधिक ऊर्जेने सराव करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ सांगलीच्या खाडिलकर गल्ली विसावा मंडळाचा आहे. या व्हिडीओत तरुण मंडळी रात्रीच्या वेळी लाठी-काठीचा सराव करताना दिसत आहेत. लाठी-काठीच्या सरावासाठी या तरुण मंडळींनी वर्तुळ तयार केले आहे आणि वर्तुळात फिरत ही तरुण मुले लाठी-काठीचा खेळ खेळत आहेत.
या व्हिडीओत तुम्हाला वयोवृद्ध आजोबासुद्धा दिसतील; जे अतिशय आवडीने लाठी-काठीचा खेळ खेळताना दिसत आहेत. इतर तरुणांपेक्षा आजोबांचा उत्साह थक्क करणारा आहे.

हेही वाचा : “…तरी मी सोडणार नाही चिकण मटण” नवऱ्यानं घेतला असा काही उखाणा; नवरीही लाजली अन् मग पाहुणेही…, व्हिडीओ एकदा पाहाच

iamvaishnavipatil या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नाद पाहिजे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजकालच्या मुलांनी मोबाईल न वापरता, अशा मर्दानी खेळाची आवड निर्माण करावी.” तर, एका युजरने लिहिलेय, “सामाजिक बांधिलकी, व्यायाम, सराव, शिक्षण व संस्कृतीचं एकत्र दर्शन.” आणखी एका युजरने लिहिले, “या आजोबांपासून प्रत्येक तरुणानं खूप काही शिकायला पाहिजे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A old man in sangli passionately doing practice of lathi kathi for ganeshotsav ganesh festival 2023 video viral on social media ndj
Show comments