कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे. अशातचं आता तेलंगणातील संगारेड्डी शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चार-पाच भटक्या कुत्र्यांनी या लहानग्यावर हल्ला केला आहे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका महिलेने कुत्र्यांना दगड मारून मुलाचा जीव वाचवल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सीसीटीव्ही चित्रणानुसार हा मुलगा धाडस दाखवत या कुत्र्यांपासून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र कुत्रे त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर पुन्हा हल्ला चढवतात. त्याला जमिनीवर पाडून त्याच्यावर तुटून पडतात. तीनही कुत्र्यांनी त्याचे चावे घेतले, त्यामुळे बराच रक्तस्त्राव झाला. मुलाचा आक्रोश ऐकून एक महिला त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अखेर कुत्रे थोडे मागे होतात आणि तिथून पळ काढतात त्यामुळे चिमुकला बचावतो.

हेही वाचा – तक्रार करून ६ तास झाले, तरीही अधिकारी झोपलेलेच; वैतागून त्यानं सापच ऑफिसमध्ये सोडला, VIDEO व्हायरल

त्या महिलेमुळे या चिमुकल्याचा जीव वाचला त्यामुळे सोशल मीडियावरही महिलेचे नेटकरी कौतुक करत आहेत. तर पालकांनी आपल्या मुलांना असे एकटे सोडू नये असा सल्ला दिला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मुलींनी ४ वर्षांनी ऐकली मृत वडिलांच्या हृदयाची धडधड! विश्वास बसत नाही ना…हा पाहा VIDEO

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.