Pakistani Girl Viral Video: सोशल मीडियामुळे जगभरातील अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहत असतो. अनेक जण ब्लॉग किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्यातील विविध गोष्टी शेअर करतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी मुलगी चक्क कब्रस्तानमध्ये जाऊन व्हिडीओ बनवताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
पाकिस्तानी मुलीने शेअर केला कब्रस्तानमधील व्हिडीओ
या पाकिस्तानी मुलीचे नाव नूर राणा असून काही दिवसांपूर्वीच तिने हा व्हिडीओ तिच्या यूट्यूब अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बहिणीच्या कबरीला भेट देण्यासाठी कब्रस्तामध्ये गेल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला नूर तयारी करता करता तिच्या बहिणीबद्दल बोलत आहे. त्यानंतर ती घराबाहेर पडून कब्रस्तानमध्ये जाते. यावेळी नूरने तिच्यासोबत गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणीदेखील घेतले होते. कब्रस्तानमध्ये गेल्यानंतर नूरने बहिणीच्या कबरीवर पाणी ओतले आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. नूरचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
कब्रस्तानमधील व्हिडीओवर नेटकरी संतप्त
नूर राणाच्या या व्हिडीओला अनेक जण ट्रोल करताना दिसत आहेत. एका युझरने लिहिलंय की, “लाज वाटायला हवी तुम्हाला, स्वतःच्या बहिणीच्या कबरीचा व्हिडीओ बनवता.” तर दुसऱ्या एका युझरने लिहिलंय की, “मला तर विश्वास बसत नाही की आपल्या समाजात अशाप्रकारे विचित्र लोक आहेत.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “लोक स्वतःच्या कुटुंबीयांच्या मृत्यूचादेखील अशाप्रकारे बाजार करतील असं वाटलं नव्हतं.”
हेही वाचा : “घड्याळ आमचे चोरुन नेले…” नवरदेवानं उखाण्यातून दिला शरद पवारांना पाठिंबा; भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
दरम्यान, नूर राणा ही पाकिस्तानी यूट्यूबर सतत तिच्या यूट्यूब आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर विविध व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिच्या अकाउंटवर ७०० पेक्षा जास्त व्हिडीओ आहेत.