सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सोशल मीडियावर रोज मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. असाच एक व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी मजेशीर कॅप्शन देत आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. “गुगल मॅप्स येण्यापूर्वी लोकांना असा ठिकाण मिळायचं”, असं कॅप्शन लिहीलं आहे.
व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती कारमधून जाताना दिसत आहे. पण मध्येच त्याला पत्ता विसरलो की काय असं वाटतं. मग काय रस्त्यात उभ्या असलेल्या गायीला गावाचा पत्ता विचारतो. आणि गायही त्याला रस्ता दाखवते. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल. गायीने पटकन दिलेलं उत्तर पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल आणि हसण्यास भाग पाडेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्व गोष्टी एकदम जुळून आल्याचं दिसतं. नेटकरी या व्हिडीओला पसंती देत आहेत.
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ ९ सेकंदाचा आहे. आतापर्यतं २० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाइक्स केला आहे. व्हिडीओवर नेटकरी आपल्या शैलीत मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत.