सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुर्देवाची बाब म्हणजे तरुणाचा मृत्यू झाला तरी उपस्थित लोक नाचत होते. कारण त्याचा मृत्यू झाल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. दरम्यान, जमिनीवर पडलेला तरुण बराच वेळ कोणतीच हालचाल करत नसल्याचं लक्षात येताच लोकांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाचता नाचता गेला जीव –

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अनेक लोक वरातीत लावलेल्या गाण्यावर डान्स करत आहेत, तर काही डान्स पाहत उभे आहेत. यावेळी डान्स करणाऱ्यापैकी एका तरुणाला हृदयविकाराचा झटका येतो आणि तो जमिनीवर पडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याला तरुण हा उत्तर प्रदेशातील एटा येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही पाहा- “माणुसकी…” हातगाडी ओढणाऱ्या व्यक्तीला ऑटो चालकाने अनोख्या पद्धतीने केली मदत, हृदयस्पर्शी Video व्हायरल

रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण शाहजहांपूरच्या कलान पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. गोकुळपुरा गावात काल रात्री एटा जिल्ह्यातून वरात आली होती. या वरातीमध्ये नाचत असताना संजू नावाच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. लोकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी संजूला मृत घोषित केलं.

हेही पाहा- उडत्या विमानात घुसला भलामोठा पक्षी; पायलट रक्ताने माखला तरीही केलं सुरक्षित लँडिंग, थरारक Video व्हायरल

लग्नाच्या आनंदी वातावरणात एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समजताच परिसरात दु:खाचं वातावरण निर्णाण झालं. दरम्यान, मृत तरुण जेव्हा जमिनीवर कोसळला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांना तो डान्सची स्टेपच करत आहे असं वाटतं. परंतु तो बराच वेळ उठला नाही तेव्हा मात्र लोकांना त्याला उठविण्याचा प्रयत्न केला तर तो बेशुद्ध पडला होता.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

एका यूजरने लिहिले की, नाचताना ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यासाठी डीजे कारणीभूत असून सरकारने डीजेच्या आवाजाबाबत कायदा करावा. आणखी एका युजरने लिहिले की, तरुणाचा मृत्यू झाला तरीही आजूबाजूचे लोक नाचत आहेत, त्यांना तो मेला हे देखील समजलं नाही.