Viral Video : एकाचवेळी अनेक गोष्टींचा समतोल राखणारे बरेचजण असतात. काही जणांना एकाचवेळी अनेक गोष्टी करणे अवघड जाते, पण काहीजण यात माहीर असतात. तर आज सोशल मीडियावर तरुणाचा एक अनोखा स्टंट पहायला मिळाला आहे. एक अज्ञात व्यक्ती डोक्यावर फ्रीज घेऊन रस्त्यावर सायकल चालवताना दिसला आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. एक अज्ञात व्यक्ती न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसतो आहे. तरुणाने एक अनोखे कौशल्य दाखवलं आहे. रस्त्यावर सायकल चालवता चालवता तरुणाने डोक्यावर फ्रीजसुद्धा ठेवला आहे. डोक्यावर ठेवलेल्या फ्रीजला न पकडता तो सायकल चालवण्यात मग्न आहे. खास गोष्ट अशी की, सायकल चालवताना तरुणाचा तोल कुठेही गेला नाही किंवा तरुणाने डोक्यावर ठेवलेला फ्रीज जमिनीवर पडलासुद्धा नाही. तरुणाने कशाप्रकारे डोक्यावर फ्रीज ठेवून सायकल चालवली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
सायकल चालवताना डोक्यावर ठेवला फ्रीज :
तुम्ही आतापर्यंत भाजी विकणाऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना डोक्यावर सामानाचे ओझे घेऊन जाताना पाहिलं असेल, पण इथे तर तरुणाने वजनदार फ्रीज डोक्यावर ठेवला आहे, ते पण कोणताही आधार न घेता. तसेच खास गोष्ट अशी की, या दरम्यान तरुण सायकलच्या सीटवर बसून नाही तर उभं राहून सायकल चालवताना दिसतो आहे; जे पाहून तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर तरुणाने केलेला स्टंट पाहून काहीजण मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @barstoolsports या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जगातली सगळ्यात मजबूत मान’ असे मजेशीर कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करताना आणि तरुणाचे कौतुक करताना दिसून येत आहेत. तर काही जण मजेशीर कमेंट करत आहेत. तसेच फ्रीजला फोटोशॉपने एडिट करण्यात आले आहे, असेसुद्धा म्हणताना कमेंटमध्ये दिसून येत आहे.