चोरी करण्याच्या विविध स्टाइल्स तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरीच्या अनेक घटना पाहून आपल्याला हसायला येते. आज वाराणसीमधील एका अशा चोराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात त्याने दवाखान्यातील चोरलेले भरपूर सामान त्याने कुठे कुठे लपवून ठेवले ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

वाराणसी बीएचयू (BHU) दवाखान्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक चोर बीएचयू दवाखान्यात शिरला आणि त्याने तेथील सामान चोरी केले खरे; पण चोरी केलेले सामान ठेवण्यासाठी तो पिशवी किंवा बॅग बरोबर घेऊन गेला नव्हता. मग त्याने जी विचित्र अन् हास्यास्पद गोष्ट केली, ती अशी की, त्याने आपल्या कपड्यांमध्येच हे सगळे सामान ठेवले. जेव्हा या चोराला पकडण्यात आले तेव्हा त्याने घातलेल्या कपड्यांमधील सर्व बाजूंनी तो सामान बाहेर काढताना दिसला. शर्टाच्या आत घातलेल्या बॉडीपासून ते पँटच्या पुढच्या आणि मागच्या खिशात त्याने सामान भरून ठेवले होते. कशा प्रकारे चोराने चोरी केलेले सामान घातलेल्या कपड्यांमध्ये लपवले होते हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

Nagpur Crime News
Nagpur Crime : विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक, मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Theft , Achole police, Vasai , Vasai strange case,
खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास
Two women who stole on the pretext of begging arrested in ulhasnagar crime news
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Shocking video man caught stealing bra panties in Bhopal video goes viral
बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

हेही वाचा… अशी पोळी बनवायला कौशल्य पाहिजे! आजीने शिकवली मोठी चपाती कशी बनवावी, व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

चोराने कपड्यांमध्येच लपवले होते सामान :

अनेकदा चोर चोरी करण्यासाठी योजना आखतो आणि मग ते सामान लपवण्यासाठी अनोखीच स्टाईल शोधून काढतो. पण, या चोराने स्वतःच्या कपड्यांचा आणि शरीराच्या सर्व अवयवांचा सामान लपवण्यासाठी उपयोग केला. सामान चोरी करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा पकडले तेव्हा त्याची झडती घेण्यात आली आणि त्याला चोरलेले सामान समोर काढून ठेवण्यास सांगण्यात आले. तेव्हा चोर कपड्यांमधून सर्व बाजूंनी दवाखान्यातून चोरलेले सामान बाहेर काढताना दिसला. सामान काढताना एकदा तो म्हणाला इतकंच आहे आणि त्यानंतर त्याने पँटमधूनसुद्धा सामान बाहेर काढले. दवाखान्यातील एक-एक वस्तू गोळा करीत त्याने भरपूर सामान दवाखान्यातून चोरले होते आणि ते जवळच्या मेडिकलमध्ये विकण्यासाठी तो घेऊन जात होता.

या चोराचे नाव संतोष तिवारी, असे आहे. उपचारादरम्यान वापरण्यात आलेल्या सामानाची चोरी करून मेडिकलमध्ये जाऊन विकण्यात हा चोर पारंगत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @goldyshirvastav या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. तसेच या व्हिडीओला ‘वाराणसीचा हा चोर आहे. त्याने #BHU हॉस्पिटलमधून वैद्यकीय वस्तू चोरल्या आहेत. इथपर्यंतही ठीक होतं; पण त्याने कुठे कुठे हे सामान लपवलं आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल’, अशी कॅप्शन देण्यात आली होती.

Story img Loader