Viral Video : भारतीय रेल्वे सगळ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. लाखो लोकांचा प्रवास दररोज रेल्वेमुळे सोपा आणि सोईस्कर होतो. व प्रवासादरम्यान प्रवाशांना वेळेत ट्रेन मिळावी यासाठी रेल्वेकडून पूल तसेच स्वयंचलित जिनासुद्धा बनवण्यात आले आहेत. तरीही अनेक प्रवासी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी उपयोग करतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एक व्यक्ती दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी रेल्वे रूळाचा उपयोग करतो आणि त्यादरम्यान त्याची चप्पल निघते.
व्हायरल व्हिडीओ रेल्वेस्थानकाचा आहे. रेल्वे रूळ ओलांडून एक अज्ञात व्यक्ती दुसऱ्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अचानक त्याच्या पायातून चप्पल निघते. चप्पल निघते म्हणून व्यक्ती पुन्हा ती चप्पल उचलून चप्पल घालण्यासाठी रेलिंगच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि चप्पल घालतो आणि चप्पल घालून झाल्यानंतर पुन्हा समोरच्या फलाटावर जाण्यासाठी धाव घेतो. दुसऱ्या फलाटावर पोहचण्याआधी समोरून ट्रेन येते. या दरम्यान व्यक्ती अगदी वेगाने आणि अगदी वेळेत दुसऱ्या फलाटावर पोहचते; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या व्यक्तीचा हा थरारक व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाचं…
हेही वाचा… घोड्यावर बसून शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी पोहोचला व्यक्ती; Video पाहून युजर्स म्हणाले…
व्हिडीओ नक्की बघा :
रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने फटकारले :
भारतीय रेल्वे मुंबईकरांची पहिली पसंती आहे. आरामदायक आणि स्वस्त प्रवास यासाठी लाखो मुंबईकर दररोज रेल्वेनं प्रवास करताना दिसून येतात. प्रवाशांना वेळोवेळी रेल्वेस्थानकावर सूचनाही देण्यात येतात; तरीही अनेकजण रेल्वेचे नियम मोडून जीवावर बेतणारे स्टंट करत असतात. तसेच या व्हिडीओतसुद्धा पहायला मिळालं आहे. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता व्यक्ती चप्पल घालण्यासाठी रेल्वेच्या दोन रूळांमध्ये उभा राहतो, त्यानंतर चप्पल घालतो आणि वेळीच दुसऱ्या फलाटावर पोहचतो. हे पाहून रेल्वेस्थानकावर उपस्थित असणारी एक व्यक्ती त्याला रेल्वेस्थानकावर खेचते आणि त्याला फाटकारतानासुद्धा दिसते .
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @IdiotsInCamera या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्याला फटकारले, हे पाहून अनेकजण बरोबर केलं; तर अनेकजण ‘बहुतेक व्यक्तीला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही आहे’ असं कमेंटमध्ये संवाद साधताना दिसून येत आहेत.