आपण प्रत्यक्षात कसे दिसतो हे आपणाला आपल्या फोटोमुळे चांगल्या प्रकारे समजते. शिवाय अनेक लोक स्वत:चा फोटो पाहून कधीकधी नाराज होतात. शिवाय ते फोटोत चांगले दिसत नसल्यामुळे निराशही होतात. मात्र याचवेळी काही लोक असे असतात जे स्वत:मध्ये काहीतरी बदल करण्याचा निर्णय घेतात. सध्या एका महिलेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. जिने एका फोटोमुळे स्वत:मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि तिने तब्बल ५० किलोहून अधिक वजन केमी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निक्की फोर्ब्स नावाची एक महिला घरी बसून तिच्या मोबाईलमधील फोटो पाहत होती. यावेळी तिने स्वतःचा असा एक फोटो पाहिला जो तिने कधी काढला हे देखील आठवत नव्हते. मात्र या फोटोमध्ये तिला स्वतःला ओळखता येत नव्हतं.
“स्वतःचा फोटो पाहून मला लाज वाटली”
निक्की म्हणाली, “स्वतःचा फोटो पाहून मला लाज वाटली आणि विचार करू लागले की, मी खरंच इतकी लठ्ठ आहे का? मी माझ्या मुलांना विचारलं, ‘हा फोटो कोणी काढला?’ यावर माझ्या ६ वर्षाच्या मुलीने सांगितले की, ‘तिने हा फोटो काढला आहे.’ यानंतर मी नवऱ्याला विचारलं, ‘मी खरच अशी दिसते का?’ त्याने मला समजावले आणि म्हणाला, नाही…, तू बसून फोटो काढल्यामुळे अशी दिसत आहेस.” निक्की पुढे म्हणाली, “मात्र हा फोटो पाहिल्यानंतर मला समजले होते की माझ्या शरीराबद्दल काहीतरी केले पाहिजे, अन्यथा मी माझ्या मुलांसाठी जास्त जगू शकणार नाही.”
यानंतर निक्कीने दररोज तिच्या अन्नातील कॅलरी मोजणे सुरू केले आणि तिने जे काही खाल्ले त्या पोषणावर संशोधन केले. छोटे आणि आरोग्यदायी बदल करण्याचा प्रयत्न केला. तसेच जास्त व्यायाम करण्याऐवजी तिने आहारातील कॅलरीज कमी करण्यास सुरुवात केली. जंक फूडची आवड असलेल्या निक्कीने जंक फूड खाणे खूप कमी केले. निक्कीने सांगितले की, ती अजूनही अनेक पदार्थ आवडीने खाते पण कॅलरीच्या मर्यादेत राहून.
२ वर्षात ५७ किलो वजन कमी केलं –
निक्कीने सांगितलं, इतके वजन असूनही, “आपण फक्त चालणे आणि दैनंदिन कामे करून भरपूर कॅलरीज बर्न करू शकतो आणि त्याच वेळी आपल्याला कमीतकमी कॅलरीज खाणं गरजेचं आहे. तिने सांगितले की, हे सर्व करून मी २ वर्षात ५७ किलो वजन कमी केले. लॉकडाऊन दरम्यान, प्रत्येकजण जास्त प्रणाणात अन्न खात होता परंतु त्या दरम्यान मी माझ्या खाण्यावर जास्त नियंत्रण ठेवले.”
आता वजन कमी झाल्यामुळे निक्की तिच्या मुलांबरोबर खेळण्यात अधिक वेळ घालवते. निक्कीला तिच्या वजन कमी केल्याचा अभिमान आहे. तिने सांगितले की, जेव्हा प्रत्येकजण जंक फूड खातो तेव्हा मी देखील काहीतरी हेल्दी खाते. मी तळलेल्या ऐवजी ग्रील्ड चिकन खाते. मी आता माझ्या मुलांच्या मागे धावू शकते; मी झोपाळ्यावर बसू शकते तसेच मी अनेक अशा गोष्टी करते ज्याबद्दल मी आधी कधी विचारही करु शकत नव्हते.