आपल्या देशात देशी जुगाड करणाऱ्यांची कमी नाहीये. शिवाय काही लोकांनी केलेल्या जुगाडाची भुरळ अनेक मोठमोठ्या उद्योगपतींना पडल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. कारण लोकांच्या उपयोगाला येणारी आणि महत्वपुर्ण जुगाडांची दखल आनंद महिंद्रा, भाविश अग्रवाल असे उद्योगपती घेत असतात. त्यामुळे आपल्या देशातील जुगाड किती महत्वाचं आहे याचा अंदाज येऊ शकता.

हेही पाहा- गाणी ऐकण्यासाठी देशी जुगाड! पठ्ठ्याने बॅटरी आणि विजेशिवाय चालणारा रेडिओ केला तयार; पाहा Video

Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
donald trump who is Vivek Ramaswamy
ट्रम्प मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद मिळालेले अब्जाधीश विवेक रामास्वामी कोण आहेत? त्यांचे भारताशी काय नाते? वाचा सविस्तर
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास

शिवाय या जुगाडामुळे अनेक अवघड कामं सोप्पी होतात आणि वेळेची बचतही होते. त्यामुळे जुगाड आपल्यासाठी महत्वाची असतातच मात्र, काही जुगाड परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कशी उपयोगाला येतात याचं एक उत्तम उदाहरण आता समोर आलं आहे. वाढत्या प्रदुषणामुळे रिसायकलिंग हे आजच्या काळात गरजेच बनलं आहे. केवळ प्लास्टिकच्या वस्तूच नव्हे तर रबर उत्पादनांचाही पुनर्वापर करणं गरजेचं बनलं असताना, एका व्यक्तीने आपल्या घरात जुन्या टायरपासून बनवलेल्या वॉशबेसिनचा फोटो उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे. तो फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- बिबट्याचा ‘हा’ अवतार तुम्ही याआधी पाहिला नसेल, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्टिवटरवर एका बाथरुममधील वॉशबेसिनचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत बेसिनचा मुख्य भाग टायरचा बनवल्याचं दिसत आहे. शिवाय अंडाकृती आकाराच्या आरशाची फ्रेमही टायरचीच बनवली आहे. या फोटोत आणखी एक जुगाड करण्यात आले आहे, ते म्हणजे पाण्याचा नळ म्हणून गॅस पंपावरती इंधन भरण्यासाठी वापरल्या जाणार्‍या आउटलेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी कॅप्शन असे लिहिले आहे की, “मला दररोज टायर्सचे नवीन उपयोग सापडतात’

गोयंका यांनी पोस्ट केलेला फोटो आत्तापर्यंत ४५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ६०० हून अधिक ट्विटर धारकांनी तो लाइक केला आहे. टायरच्या या अनोखा वापर अनेकांना आवडला आहे. काही नेटकऱ्यांनी अशा टायरांचा वापर ट्रेनच्या बाथरूममध्ये कसा करता येईल याबाबत कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी टायर्सना गंज लागण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांचा असा उपयोग करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

या फोटो नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून अनेकांनी ज्या व्यक्तीने त्याच्या बाथरुममध्ये हे जुगाड केलं आहे त्याचं खूप कौतुक केलं आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं आहे की ,’टायराचा हा वापर पर्यावरणास अनुकूल आहे.’ तर एका नेटकऱ्याने म्हटलं कमेंटमध्ये लिहलं आहे की, ‘याचा वापर काळजीपुर्वक करायला हवा कारण टायर हा ज्वलनशील वस्तूंपैकी एक आहे.’