नोटाबंदीनंतर एटीएमच्या बाहेर रांगच्या रांग पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणचे एटीएम अद्यापही सुरू झाले नाहीत, त्यामुळे जिथे एटीएम सुरु झालेत तिथून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी तासन् तास रांगा लावायला सुरूवात केल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून असे अनेक फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील अशातच एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यात एटीएमच्या बाहेर नागरिकांनी रांग लावली आहे तर दुसरीकडे एक रांग या एटीएमच्या रांगेपेक्षाही आणखी मोठी आहे त्यामुळे सध्या पैशांपेक्षा लोकांना काय एवढे महत्त्वाचे वाटत आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमधली ही भलीमोठी रांग पैशांसाठी लावण्यात आली नसून ती दारूसाठी लावण्यात आली होती. फेसबुकवर हा फोटो टाकण्यात आला, त्यानंतर अनेक वर्तमानपत्रातही हा फोटो आला. केरळमधला हा फोटो असून ही रांग एटीएमच्या रांगेपेक्षाही मोठी होती. केरळमधल्या एका जिल्हाधिका-यांनी हा फोटो फेसबुकवर टाकला आणि अल्पवाधितच सोशल मीडियाच काय पण अनेक माध्यमात तो चर्चेचा विषय बनला. लोक दारुच्या किती आहारी गेले आहेत याचे हे वास्तवदर्शी चित्र आहे. काही दिवसांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय जाहिर केल्यानंतर बँकेच्या आणि एटीएमच्या बाहेर तासन् तास रांगा लावाव्या लागतात त्यामुळे लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. अशातच जर लोक दारूसारख्या वाईट गोष्टीसाठी रांग लावू शकतात मग देशाच्या सुधारणेसाठी का नाही असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.

Story img Loader