सिंहासमोर भल्याभल्या प्राण्यांची अवस्था वाईट होते. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. सिंहाला पाहताच जंगलातील इतर प्राणी घाबरून इकडे तिकडे धावू लागतात. सोशल मीडियावर सिंहांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेक व्हिडीओमध्ये सिंहाचे भयावह रूप पाहायला मिळते. मात्र, सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
म्हशीच्या कळपाने केला हल्ला
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये म्हशींचा कळप जंगलाच्या राजा सिंहावर मात करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, म्हशींच्या कळपासमोर जंगलाच्या राजाची अवस्था इतकी वाईट होते की तो घाबरून झाडावर चढतो. वाइल्ड अॅनिमल्स नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सिंह म्हशीच्या कळपापासून वाचण्यासाठी झाडावर चढला.’
(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबानंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
व्हिडीओतून शिकवण
एकात्मतेत खूप ताकद असते हे सांगण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा आहे. नेटीझन्स या व्हिडीओला प्रचंड पसंती देत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, म्हशींचा कळप जंगलाच्या राजाला चांगलाच चिडवत आहे. यानंतर तो सिंहाला पळवून लावतो. सिंह धावत जाऊन एका झाडावर चढतो.
(हे ही वाचा: Pune Metro: पुणे मेट्रोतील दोन बायकांचा भांडणाचा मजेशीर Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य आश्चर्यकारक आहे, कारण जेव्हा सिंह एखाद्या प्राण्यावर हल्ला करतो तेव्हा त्याला त्याची अजिबात दया येत नाही आणि तो त्याची अवस्था बेकार करतो. हा व्हिडीओ बघून सोशल मीडिया यूजर्स सिंहाच्या अवस्थेची कीव करताना दिसत आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत २१ हजारापेक्षा लोकांनी बघितला आहे.