Viral Video : कोल्हापूर हे महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन असे शहर आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे आणि अनेक प्रसिद्ध ठिकाणे या शहराचा इतिहास सांगतात. न्यू पॅलेस, रंकाळा तलाव, महालक्ष्मी मंदिर ही कोल्हापूरातील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. कोल्हापूरात येणारी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणांना आवर्जून भेट देतो. कोल्हापूरातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कोल्हापूरातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय ठिकाणाविषयी सांगितले आहे. (Kolhapur vdeo Rankala Lake: A Place of Happiness for Kolhapurkars – Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रंकाळाजवळचा परिसर दिसून येईल. या व्हिडीओत तुम्हाला काही तरुण मंडळी सुंदर मराठी गीत गाताना दिसत आहे. गिटारच्या तालावर तरुण मंडळी ‘मल्हार वारी’ गीत गाताना दिसतात. त्यांचे अप्रतिम गीत ऐकण्यासाठी त्यांच्या आजुबाजूला लोकांनी गर्दी केली आहेत. काही लोक त्यांचं गाणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “कोल्हापूरकरांसाठी सुखाचं एक ठिकाण म्हणजे रंकाळा”
रंकाळावर सूर्यास्ताच्या वेळी खूप गर्दी होते. येथून खूप सुंदर सूर्यास्त दिसतो. रंकाळा शहरातील एक प्रमुख आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे.
रंकाळा तलाव व त्याच्या सभोवतालच्या परिसरात कोल्हापूरकर प्रचंड गर्दी करतात. तरुणाईपासून वृद्धांपर्यंत अनेक जण क्षणभराचा विसावा घेण्यासाठी रंकाळाला भेट देतात. रंकाळाजवळ असे अनेक तरुण मंडळी त्यांची कला सादर करताना दिसतात.
पाहा व्हायरल व्हिडीओ
kolhapur_sound_city या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुख”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “विषय हार्ड, आम्ही कोल्हापूरकर” तर एका युजरने लिहिलेय, “सुख म्हणजे आपण कोल्हापूर” आणखी एका युजरने लिहिलेय, “जगात भारी आम्ही कोल्हापुरी” एक युजर लिहितो, “हे फक्त आपल्या कोल्हापूरातच बघायला मिळालं” तर एक युजर लिहितो, “कोल्हापूरचा विषयच हार्ड” .या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वीही कोल्हापूरच्या अनेक ठिकाणचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रंकाळ्यावरील व्हिडीओ तरुण मंडळी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.