Cobra Found in Dustbin: साप कुठेही लपून राहू शकतात. मग ती बाईक असो, कार असो किंव कोणताही कोपरा असो. सापांना लपण्यासाठी उबदार, कोरडी आणि अंधार असलेली जागा आवडते. तुम्ही इंटरनेटवर सापाचे पाहिले असतील. यात काही सापाला रेस्क्यू करतानाचेही व्हिडिओ आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्राला अशा ठिकाणाहून बाहेर काढले आहे की त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा साप चक्क आपल्या घरातील डस्टबिनमध्ये लपून बसला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरात साप लपून बसला आहे. हा साप अशा ठिकाणी लपून बसला आहे की त्याचा कुणीही विचार केला नसेल. हा साप साधासुधा नसून विषारी नाग आहे. आणि हाच नाग चक्क  कचऱ्याच्या डब्ब्याखाली लपून बसलेला निघाला. तो ज्याप्रमाणे कचऱ्याच्या डब्ब्याला चिकटून बसला ते पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या नागाला बाहेर काढण्यासाठी घरातील काहीजण प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र हा नाग आक्रमकपणे त्यांच्यावरच हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहू तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मासे पकडायला गेले अन् गळाला अडकली महाकाय मगर; क्षणात व्यक्तीला खेचलं अन्..Video व्हायरल

आता युझर्सनेही आपले घर तपासण्यास सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवर एका खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला असून या पोस्टवर आता वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A poisonous snake hidden under the dustbin in the house video viral on social media srk