उत्तर प्रदेशातील कानपूरचे पोलीस सतत वादात सापडतात. कधी येथील पोलिसांचे वैयक्तिक फोटो व्हायरल होतात तर कधी अश्लील चॅटच्या बातम्या समोर येतात. अशातच आता आणखी एका कारणामुळे कानपूरचे पोलीस वादात सापडले आहेत. या वादाला कारण ठरलं आहे, एका कॉन्स्टेबलने कॉलगर्ल डीलरशी केलेलं चॅट. धक्कादायक बाब म्हणजे कॉन्स्टेबलने कॉलगर्ल डीलरशी केलेलं सर्वांसमोर आणणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसाचं चॅट व्हायरल आणि पत्रकारावर गुन्हा दाखल –

सोशल मीडियावर एक चॅट व्हायरल झालं आहे. ज्यामुळे एक कॉन्स्टेबल कॉल गर्ल डीलरशी वेश्याव्यवसायाच्या संदर्भात बोलणी करत असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रसारमाध्यमांनी या घटनेची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी पत्रकारावर गुन्हा दाखल करत त्याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हेही पाहा- चिमुकला पायऱ्यांवरून पडणार तितक्यात आईने उडी मारली अन्…, थरारक Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

दरम्यान, पीडित पत्रकाराने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सह पोलीस आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही चॅट, पत्रकाराचे आरोप आणि पोलिसाची भूमिका तपासत आहोत. तर व्हायरल झालेल्या चॅटची अद्याप पुष्टी झालेली नाही.

हेही पाहा- Video: माणुसकीला काळीमा, भाकरीचं आमिष दाखवत प्राण्यांची चेष्टा; भाकरीला बांधलेला साप पाहताच नेटकरी संतापले

या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होताच अनेकांनी कानपूर पोलिसांवर वेगवेगळे आरोप केले आहेत. मोहम्मद अली नावाच्या युजरने लिहिले की, पोलिस स्वतः खंडणीखोर आहेत, पोलिसांकडून खंडणी मागण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही. विवेक मिश्रा नावाच्या युजरने लिहिले की, या इन्स्पेक्टरचा सहभाग असल्याचे दिसते. याची कडक चौकशी व्हायला हवी. त्यांना निलंबित करायला पाहिजे. या प्रकरणाबाबत सह पोलीस आयुक्तांनी पाच मुद्यांवर चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून, आम्ही चॅटची चौकशी करत असून पत्रकाराच्या आरोपांची आणि भूमिकेचीही चौकशी करत आहोत, चॅट कुठून व्हायरल होत आहे, चौकी प्रभारींवरील आरोपांचीही चौकशी केली जाईल, असं आनंद प्रकाश तिवारी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A police chat with a call girl dealer and a case was registered against the journalist who gave the news jap
Show comments