कधी मजेशीर तर कधी हृदयद्रावक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओज असे आहेत जे पाहिल्यानंतर हृदय अभिमानाने भरून येते. सध्या एका पोलिसाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही त्याला सलाम केल्याशिवाय राहणार नाही. गुन्हेगारी रोखणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे या कामासाठी पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र या पोलिस कर्मचाऱ्याने जे केले ते त्याच्या कर्तव्यापलीकडे होते. एक माणूस म्हणून त्याने हे कर्तव्य बजावले आहे. वर्दीतल्या माणुसकीची झलक पाहायला मिळत आहे.

पोलिसाने कृतीने जिंकले मन

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर zindagi.gulzar.h नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती त्याच्या सायकलाला जोडलेल्या वाहनावर लोखंडी सळई ठेवलेल्या आहेत आणि तो एका पुलावरून जात आहे. चढ असल्यामुळे त्याला लोखंडी सळईसह गाडी ओढणे अवघड जात आहे. तो हळू हळू गाडी ढकलत पुढे जात आहे. हे दृश्य पाहून तेथून जाणाऱ्या पोलिसाला त्याची दया येते आणि तो धावत त्याच्या मदतीला येतो. गाडीला मागून धक्का देत पुढे नेतो. इतके चांगले काम करणाऱ्या पोलिसाचा चेहरा मात्र व्हिडिओमध्ये दिसत नाही.

हेही वाचा – बजरंगबलीच्या दर्शनासाठी उंच टॉवरवर चढला भक्त! हनुमंताच्या चरणाशी बसलेल्या माकडाचा Video Viral

येथे व्हिडिओ पहा –

हेही वाचा – Viral Video : ढोल ताशाच्या तालावर नाचणाऱ्या जपानी नवरीचा मराठमोळा थाट! नऊवारी, दागिने अन् मुंडवळ्यासह केला साज शृंगार

लोकांनी पोलिसाचे केल कौतूक

हा व्हिडिओ ८ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर त्याला ३१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक कमेंट करून या पोलिसाला सलाम करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “दिखाव्याच्या जगात राहू नका, ही वास्तविकता पाहून जागे व्हा” दुसरा म्हणाला, “साहेब तुम्हाला सलाम, तुम्ही असताना या जगात काहीही चूकीचे होऊ शकत नाही.” तिसऱ्या युजरने लिहिले, “वर्दीतील प्रत्येक व्यक्ती असा असावा” तर दुसऱ्याने लिहिले, “सलाम तुम्हाला सर.”

Story img Loader