Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी लहान मुलांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात तर कधी वृद्ध लोकांचे व्हिडीओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ भावूक करणारे असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक लहान मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान चिमुकला कुत्र्याला आइसक्रीम खाऊ घालताना दिसत आहे. चिमुकल्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल. त्याच्या हातात प्लास्टिकची पिशवी आहे आणि दुसऱ्या हातात आइसक्रीम आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकला कुत्र्याला आइसक्रीम खाऊ घालताना दिसत आहे. चिमुकला अतिशय प्रेमाने कुत्र्याला खाऊ घालतोय. त्याच्यातील माणुसकी पाहून तुम्हीही या चिमुकल्याचे चाहते व्हाल. या व्हिडीओवर ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’ हे लोकप्रिय गीत लावले आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. माणुसकीचे दर्शन घडवणारा व्हिडीओ खरंच अनेकांना खूप काही शिकवणारा आहे. हा चिमुकला स्वत: गरीब असून त्याच्या घासातला घास कुत्र्याला देत आहे. या चिमुकल्यावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
chitrabasarkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ऊन आमच्या मुक्या प्राण्यांना सुद्धा लागते. यांना सुद्धा थोडे थंड खाऊ घालावे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जगातील सर्वात श्रीमंत मुलगा” तर एका युजरने लिहिलेय, “माणूस तो घरी जन्माला येतो परंतु माणुसकी कुठे कुठे जन्माला येते” आणखी एका युजरने लिहिलेय, “ज्यांनी हा व्हिडीओ शूट केला त्यांनी सुद्धा मदत केली असेल, अशी आशा करतो” एक युजर लिहितो, “जीना इसी का नाम है” काही युजर्सना या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी या चिमुकल्याला मदत करण्याचे आवाहन केले आहेत.